श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार काही शेतकऱ्यांनी नुकताच उघडकीस आणला आहे.याबाबत आता कायदेशीर मार्गदर्शन घेऊन रितसर तक्रार केली जाणार असल्याचे समजते.दरम्यान हे प्रकरण दडपण्यासाठीही कृषी सेवा केंद्र चालकाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. असेच प्रकार शेजारील तालुक्यांत देखील घडत आहेत.आता अशा सर्व संबंधित कृषी सेवा केंद्रांची गुण नियंत्रक पथकाडून तपासणी करण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील काही सजग शेतकऱ्यांनी एका नामांकित कंपनीचे पोषक या पूर्व भागातील कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले.खरेदी केल्यानंतर त्यावरील कोड स्कॅन करण्याचा प्रयत्न केला.परंतु खरेदी केलेले ते औषध एका मोठ्या कंपनीच्या नावाने बनावट पद्धतीने विकले जात असल्याने तो कोड स्कॅन झालाच नाही.त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा संशय बळावला. आपण खरेदी केलेले औषध बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी याबाबत कृषी विभागातिल काही निवृत्त अधिकारी व संघटना यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संबंधीत नामांकित कंपनीच्या नावाने ही औषधे बनावट पध्दतीने शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या या गंभीर प्रकाराची चौकशी होऊन सर्व संबंधित कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरगरीब शेतकऱ्यांकडून केली जात आहे.मुळातच शेती पिकांचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला असताना त्यात शेतकऱ्यांची अशी औषधांच्या बाबतीत फसवणूक केली जात असेल तर त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायलाच प्रवृत्त केले जात असल्यासारखा हा गंभीर प्रकार आहे.

श्रीरामपूरसह शेजारच्या तालुक्यात अशा प्रकारे शेतकऱ्यांना सर्रासपणे बनावट औषधे व कीटकनाशके यांची विक्री केली जात आहेत. याबाबतचे आपले कायदे कुचकामी ठरत असल्याने त्यातील पळवाटा शोधून काही कृषी केंद्र चालक अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना लुटन्याचे हे प्रकार करत आहेत.
-अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

2 thoughts on “श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार”

  1. बातमी देताना हवेत बाण मारू नयेत . कोणता दुकानदार ? कोणत्या कंपनी ची बनावट औषधे विकतो ? कोणत्या शेतकऱ्याने प्रकरण उघडकीस आणलं? कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हा प्रकार चालू आहे ?पुढे काय कारवाई झाली? वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत वृत्तपत्राने किंवा बातमीदाराने दाखवावी. शेजारच्या तालुक्याचा उल्लेख करता, आपल्या शेजारी एकच तालुका आहे का? करा ना उल्लेख स्पष्टपणे ज्यांनी गुन्हे केले ते नाही घाबरत तुम्ही का घाबरता ?

  2. तक्रार दाखल झाल्याशिवाय नाव घेता येत नाही बातमीत.. पत्रकारिता समजत नसेल तर तोंड खुपसू नये

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!