श्रीरामपूर-
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व इतर उपक्रम त्यांच्या मार्फत राबविले जातात. अहिल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व भाजप उत्तर अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस असलेल्या पूजा चव्हाण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खा.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १२ वर्षांपासून भारतीय सैन्य दलांना राख्या पाठवितात.यंदाही मेघालय,आसाम,जम्मू,लडाख पंजाब,बेंगलोर ,अंबाला आदी ठिकाणी जवानांना पोस्टाद्वारे ११ हजार राख्या पूजा चव्हाण यांनी पाठविल्या आहेत.श्रीरामपूर येथे माजी खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,गिरीधर आसने,अभिषेक खंडागळे,भाऊसाहेब बांदरे ,मंजुषा ढोकचौळे,पुष्पलता हरदास यांसह अनेक पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.रक्षाबंधन हे आता बहीण-भावापुरते मर्यादित न राहता, रक्षणकर्त्या प्रत्येक घटकांशी बांधील झालेले आहे. निसर्गाशीही रक्षाबंधनाचे नाते जोडले गेले आहे. अशा वेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत राख्या पोहोचविण्याचे पूजा चव्हाण यांचे कार्य निश्चित सैनिकांचे मनोधैर्य उंचाविणारे असल्याचे डॉ.सुजय विखे म्हणाले.राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
