कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात...

श्रीरामपूर-
माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासित केले होते. त्यानुसार आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने २ जून २०२६ रोजी कर्जमाफीचा काढण्यात आलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सदर जीआर च्या आधारे प्रचंड फसवणूक झालेली आहे. सरकारने सदर जीआर च्या माध्यमातून अप्रत्यक्ष शेतकऱ्यांची वसुली करण्याचा जीआर काढला आहे. दिवसेंदिवस शेतमालाला मागील गेल्या वीस वर्षापासून उत्पादन खर्च भरून निघेल इतका दर केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे मिळाला नाही. १९८३ मध्ये तत्कालीन काँग्रेसचें मुख्यमंत्री स्व. ए. आर. अंतुले यांनी दहा हजार रुपये पर्यंतची कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उदार मनाने दिली होती. सदर कर्जमाफीमध्ये कुठल्याही तारखेची व क्षेत्राची अट नव्हती.बहुतांश शेतकऱ्यांचे कर्जे त्यावेळी माफ झाले होती. त्यावेळी सोने १२०० रुपये प्रति तोळा होते.आज ते १५०,००० /- रुपये तोळा आहे. मागील ४५ वर्षाच्या तुलनेत आज रोजी किमान १२ लाख रुपये पर्यंतची सरसकट कर्जमाफी योजना आणणे गरजेचे होते.
परंतु दुर्दैवाने त्यानंतर कुठल्याही सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी व सुखकर जीवन जगण्यासाठी अशा प्रकारची कर्जमुक्ती योजना आणली नाही. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या तीन-चार वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या एकमेव मागणीसाठी सातत्याने आंदोलने छेडली गेली. फडणवीस सरकारने वचननाम्यातील वचनपूर्ती करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना क्षेत्राची, रकमेची व तारखेची अट न लावता सातबारा कोरा करावा. अन्यथा याबाबत जनजागृती करण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गाव तेथे कर्जमुक्ती योजनेच्या फसव्या जीआरची होळी करण्यात येईल. १  जुलै २०२६ पासून शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही जिल्हाध्यक्ष औताडे यांनी दिला.
यावेळी शेतकरी संघटनेच्या माळेवाडी शाखेचे शाखाध्यक्ष दिलीप औताडे, उपाध्यक्ष शैलेश वमने शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ सहकारी सोसायटी चेअरमन दिलीपतात्या  औताडे, साहेबराव चोरमल, महांकळ वाडगाव शाखेचे शाखा अध्यक्ष कडू पवार, सतीश नाईक, दिगंबर औताडे, ग्रा.पं.स. जालिंदर औताडे, ग्रा.पं.स.बाबासाहेब औताडे, देविदास वमने, दादासाहेब जाधव, योगेश वमने, बबन औताडे, सिताराम औताडे, सोसायटी सदस्य भरत वमने  ग्रा.प.स.प्रकाश ढोबळे, विलास औताडे बाबसाहेब औताडे (सराला), राजाराम औताडे, विलास गोरे, सतीश गायकवाड, कृष्णा औताडे, कल्ल्यान बहिरट,दिलीप सरोडे सोन्याबापू औताडे  बाबसाहेब(बंडू )औताडे,दगू मोहन, राधूजी मोहन, सुनिल पवार, बाळासाहेब निकम, किशोर मोहन व ज्येष्ठ शेतकरी हरिभाऊ ताकेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!