पुणे- नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर स्टेशनला थांबा द्या;आ.हेमंत ओगले यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-
नव्याने चालू झालेल्या पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सदर पत्रात नमूद केले आहे की, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, नेवासा त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील श्रीक्षेत्र सरला बेट, महानुभव पंथाचे व शीख धर्मियांचे कमलपूर आणि हरेगाव येथील मत माऊली या सर्व धर्मियांच्या उत्सवाकरिता देशभरातून हजारो भाविक येत असतात, या सगळ्या देवस्थानांना बेलापूर हेच मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. तसेच श्रीरामपूर ते पुणे प्रवास करणाऱ्यांची प्रवासी संख्या देखील लक्षणीय आहे त्यामुळे पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास निश्चितच भाविकांबरोबरच प्रवाशांची देखील सोय होणार आहे त्यामुळे आपण सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी आमदार ओगले यांनी पत्राद्वारे केली आहे. याबाबत आपण लवकरच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री वी सोमन्ना आणि रवणीत सिंग यांची भेट घेणार असून पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस बरोबरच अजुन काही महत्वपूर्ण रेल्वे गाड्यांना बेलापूर रेल्वे स्थानकात थांबा मिळणेकामी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. हेमंत ओगले

Leave a Comment

संबंधित बातम्या

पोरा बाळांच्या टीकेवर नका बोलू,पण जनतेचे तर प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.सुजय विखे यांचा नाव न घेता थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ द्या,असा खोचक टोला मा.खा. सुजय विखे यांनी

पुणे- नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर स्टेशनला थांबा द्या;आ.हेमंत ओगले यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-नव्याने चालू झालेल्या पुणे - नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सदर पत्रात नमूद

श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार

सैनिकांसाठी पाठविल्या ११ हजार राख्या;श्रीरामपूरच्या सौ.पूजा चव्हाण यांचा उपक्रम

श्रीरामपूर-देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक

दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व नोकरी करिता बॅटरीवरील सायकल प्रदान;मा.खा.डॉ.सुजय विखे यांचे विशेष सहकार्य

श्रीरामपूर-डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्यामार्फत आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या विशेष सहकार्यामुळे आज श्रीरामपूर येथील कु.दर्शना पापडीवाल या दिव्यांग

सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ परत;नेवासा पोलीसांनी विधिवत केले परत

श्रीरामपूर-नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ संबंधितांना नेवासा पोलीसांनी मंगळवारी परत केले.रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२ हजार ४०० रुपये किमतीचे पितळी

Latest News

Trending News