सेवानिवृत कर्मचाऱ्यांचा भरपावसात एल्गार;धरणे आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाचे वेधले लक्ष

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पालिका कार्यालयासमोरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी पाऊस कोसळला. मात्र आपल्या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पालिका कार्यालयासमोरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी पाऊस कोसळला. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंडप सोडला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत एकाही पालिका अधिकऱ्याने आंदोलनाची दखल घेतली नाही.श्रीरामपूर नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनच्यावतीने हे आंदोलन सुरू आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दहा, वीस व तीस वर्षांनंतर अनुज्ञेय ठरणारी लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करून फरक अदा करावा, या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यींच्या एकाकी पदाची वेतन निश्चिती चुकीची केली आहे. त्यात दुरूस्ती करून  वेतन निश्चिती करून देय रक्कमा त्वरीत दिल्या जाव्यात, अनेक कर्मचारी निवृत्त होऊन एक वर्ष होऊन गेले तरीही त्यांचे उपदान व सेवा निवृत्ती वेतन लागू केलेले नाही. अशा कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुरू करावे, सेवा निवृत्तीनंतर  तीन महिन्यांमध्येच सर्व देय रकमा अदा करून सेवा निवृत्ती वेतन लागू करणे आवश्यक असते. मात्र पालिका अधिकऱ्यांकडून दान वर्षे उलटूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आयुक्त कार्यालयास योग्य पाठपुरावा केला जात नाही. जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जाते. त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.या सर्व मागण्यांसदर्भात २ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संघटनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष रमेश अपिल, संजय आढाव, रावसाहेब काळे, भानुदास जाधव, विनोद चव्हान, भानुदास थोरात, बाळासाहेब जाधव, हिवराळे सुदामा, झुंगा शेळके, अनिल झिंगारे, बाळासाहेब चव्हान, चंद्रकांत सोनवणे, लताबाई जगधने, ताराबाई झिंगारे, माणिक जाधव, ज्ञानदेव आमराव, अनिल काजळे, नर्मदा  सुरडकर, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

मुख्याधिकारी मागील दाराने…
दररोज दुपारी जेवनाच्या सुटीत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप हे पालिकेच्या समोरील बाजूने जात असतात. मात्र आंदोलनकर्ते पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेले होते.यावेळी मुख्याधिकारी यांनी पालिकेच्या मागील दाराने जाने पसंत केले. गेल्या अनेक दिवसांपासून हे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडत असून त्याची दखल घेतली जात नाही. उलट आंदोलनाकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!