जर्सी गोऱ्हे केली प्रांताधिकाऱ्यांच्या हवाली; संगमनेर प्रांत कार्यालयात शिवआर्मी व शेतकरी संघटनेचे आंदोलन

श्रीरामपूर-शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा तसेच वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा मागे घ्यावा अथवा प्रतिभाकड जनावर वीस हजार रुपये प्रति महिना शेतकऱ्यांना...

श्रीरामपूर-
शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा तसेच वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा मागे घ्यावा अथवा प्रतिभाकड जनावर वीस हजार रुपये प्रति महिना शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे,या मागण्यांसाठी संगमनेर येथील प्रांत कार्यालयात शिवआर्मी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने जर्सी गोऱ्हे घालत संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या ताब्यात दिले.आंदोलन प्रसंगी संगमनेरचे प्रांताधिकारी यांनी 11 जर्सी गोऱ्हे रीतसर पंचनामा करून ताब्यात घेऊन याबाबत शासनाकडे आपण पशुपालकांची समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासित केले.
भाकड गाई व जर्सी गोऱ्हे यांच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न गेल्या काही काळापासून निर्माण झाल्याने प्रांत कार्यालयात जर्सी गोऱ्हे घालून आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिव आर्मी संघटनेचे दत्ता ढगे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, 2015 पर्यंत आपल्या देशात गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात नव्हता. त्यावेळी आपला देश डेन्मार्क या देशाला मागे टाकत बीफ व दुग्ध उत्पादनात अग्रेसर राहत त्या निर्यातीतही पुढे होता.

संगमनेर येथील प्रांत कार्यालयात शिवआर्मी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने जर्सी गोऱ्हे घालत संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आली.

त्यावेळी शेतकऱ्यांना भाकड गाई व जर्सी गोऱ्हे यापासून दोन पैसे मिळत होते. परंतु 2015 नंतर हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी सरकार अस्तित्वात आले. त्यांनी गोवंश हत्या बंदी कायदा व वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा अस्तित्वात आणल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी पोहोचली आहे. गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे कुरेशी समाजाने जनावरे खरेदी-विक्री बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुउत्पादक पशूंचे पालन पोषण करणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे झाले आहे. या बाबींचा गंभीर परिणाम शेतकरी सदर जनावरे ओढे , नाले, नद्या अशा सार्वजनिक ठिकाणी सोडताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच सदर जनावरांवर कुत्र्यांसारखे इतर हिंस्र प्राणी हल्ला करून तसेच उपासमारीने जनावरे मरत आहे. याबाबतचा परिणाम पर्यावरणावर  होत असून दुर्गंधी सुटत आहे. तरी शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा तसेच वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा मागे घेण्यात यावा अथवा प्रतिभाकड जनावर वीस हजार रुपये प्रति महिना शेतकऱ्यांना थेट गोठ्यात अनुदान द्यावे.शासनाने निर्मित केलेल्या भाकड जनावरांसाठीच्या गोशाळा या फक्त अनुदान लाटण्याकरता आहेत. वास्तविक गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये सुधारणा करून देशी गोवंश हत्या बंदी कायदा अशा प्रकारे अस्तित्वात आणणे गरजेचे होते. जर्सी व होस्टेन गोवंश हा बाहेरील देशातून दुग्ध उत्पादन वाढीसाठी आयात केलेला असून सदर कायद्याचा परिणाम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांवर झाला असून पशुपालकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, शिव आर्मी शेतकरी संघटनेचे दत्ता ढगे, शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, शिव आर्मीचे रवी पवार ,मंगेश गुंजाळ, विकास गुंजाळ, रवींद्र आरगडे, सदाशिव हासे, रवी हासे, ऍड गोपीनाथ घुले, शेतकरी संघटनेचे सागर गिऱ्हे, अमोल गुळवे आधी पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग नोंदवला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!