निवडणुक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न; निवडणूक आयोगासोबत बैठक;आदिक यांचा सहभाग

श्रीरामपूर-निवडणूक आयोगाने देशपातळीवर सुरू केलेल्या एका विशेष उपक्रमाअंतर्गत विविध पक्षप्रमुखांना बोलावून भविष्यातील निवडणूक प्रक्रियेबाबतच्या संकल्पनांवर चर्चा सुरू केली आहे.(बि.एल.ऑ.) मतदान केंद्रस्तरीय...

श्रीरामपूर-
निवडणूक आयोगाने देशपातळीवर सुरू केलेल्या एका विशेष उपक्रमाअंतर्गत विविध पक्षप्रमुखांना बोलावून भविष्यातील निवडणूक प्रक्रियेबाबतच्या संकल्पनांवर चर्चा सुरू केली आहे.(बि.एल.ऑ.) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि बुथ प्रमुख यांच्यामध्ये संवाद करून निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात पारदर्शकता आणण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नवी दिल्ली येथे
निवडणूक आयोगासोबत राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांची बैठक पार पडली.नवी दिल्ली येथील निवडणूक आयोगाच्या आयोग सभागृह, निर्वाचन सदन, अशोक रोड येथे  निवडणूक आयोगासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्याशी राष्ट्रीय सरचिटणीस आणि अधिकृत प्रतिनिधी ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आणि निवेदन देण्यात आले.यावेळी निवडणूक आयोगाने देशपातळीवर सुरू केलेल्या एका विशेष उपक्रमाअंतर्गत पक्ष प्रमुखांना बोलावून भविष्यातील निवडणूक प्रक्रियेबाबतच्या संकल्पनांवर चर्चा झाली.(बि.एल.ऑ.) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि बुथ प्रमुख यांच्यामध्ये संवाद करून निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून करता येईल. बैठकीत विविध निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पक्षाच्या वतीने लोकशाही मूल्यांचे जतन आणि पारदर्शक निवडणुकीसंदर्भातील सूचनांची मांडणी करण्यात आली.या बैठकीस मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू, राष्ट्रीय सरचिटणीस आणि अधिकृत प्रतिनिधी ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नवी दिल्ली येथे
निवडणूक आयोगासोबत राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांची बैठक पार पडली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!