श्रीरामपूर-
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात आल्याने प्रवरा परिसरासह जिल्हाभरात आनंद व्यक्त करण्यात आला. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्षाने त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.येणाऱ्या काळात पक्षसंघटना अधिक बळकट करत कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना व्यक्त केला.यावेळी मंत्री गिरीष महाजन, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, खासदार स्मिता वाघ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
