उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग...

श्रीरामपूर-
उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी नानासाहेब गलांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत योगिता गलांडे-मस्के यांनी सांगितले की, नानासाहेब गलांडे पाटील जमीन नोंद प्रकरणात अखेर सत्य उघड झाले असून ३०/१/२०२६ रोजी भूमीलेख उपसंचालक नाशिक यांनी अपीलवरील अंतिम निर्णयानंतर उंदीरगाव येथील गट क्रमांक ७९ संदर्भातील वादग्रस्त फेरफार कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरवत मूळ नोंदी कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. जमीन नोंद
फसवणूक प्रकरणे रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही योगिता गलांडे मस्के यांनी म्हटले आहे.दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन घडामोडीही वेगाने पुढे सरकत असून फसवणूक व बनावट कागदपत्रांच्या आरोपांप्रकरणी आरोपी क्रमांक १ प्रवीणकुमार उत्तमचंद छल्लानी व आरोपी क्रमांक २ राजेंद्र‌कुमार दुधेडिया यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६८, ४७१ सह ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मा. जितेंद्र डी. जाधव, न्यायाधीश प्रथम श्रेणी, कोर्ट क्रमांक १, श्रीरामपूर यांनी २५/२/२०२६ रोजी आदेश दिले आहेत. आरोपी क्रमांक ३ पंकज सुधाकर फेगडे, उप अधीक्षक, भूमिअभिलेख यांच्याविरुद्धची तक्रार फौजदारीप्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १९७ अंतर्गत मंजुरीच्या अभावामुळे नाकारण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस तपासही करण्यात आला असून, जबरदस्तीने नोंद लावून घेतल्याबाबत संबंधित अधिकाऱ्याने कबुली दिल्याची नोंद तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले त्यामुळे खोटी नोंद व दबावातून करण्यात आलेल्या फेरफार प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून प्रशासन व न्यायव्यवस्थेच्या कारवाईमुळे अशा प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ह्या सर्व प्रकरणाचे कामकाज अॅड. बापूसाहेब इंगळे, अॅड. अरुण लबडे, अॅड. यशवंत उंडे यांनी बघितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!