प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती...

श्रीरामपूर-
येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु त्या गुन्ह्यामध्ये वाढीव कलमांचा समावेश करावा म्हणून अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून अर्ज द्वारे केली आहे.
दि .16.02.2026 रोजी बाभबळेश्वर राजुरी रोडवर मध्यरात्री जवरे यांना चार चाकी गाडी आडवी लावून पाच अज्ञात हल्लेखोरांनी प्राण घातक हल्ला केला होता त्यामुळे सदरच्या दाखल गुन्ह्यांमध्ये जीवघेणा हल्ला व आज्ञात हल्लेखोर पाच असल्यामुळे संघटित गुन्हेगारी अशा दोन वाढीव कलमांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जवरे यांनी अर्जात केली आहे.
एफ आय आर दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी संजय विखे यांनी जवरे यांना त्याच दिवशी संध्याकाळी व पुन्हा दुसऱ्या दिवशी घटनास्थळी बोलून दोन साक्षीदार व दोन पंच घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर जवरे यांनी ते तुम्ही बघा, ते तुमचे काम आहे असे म्हटल्यानंतर तपास अधिकारी यांनी राग मनात धरून आपल्या कर्तव्यात कसूर करून फिर्यादी यांच्याशी हुजत घालण्यात सुरुवात केल्याची तक्रार अप्पर पोलीस अधिकारी यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांना सदर प्रकरणातले तपास अधिकारी बदलण्याचे आदेश दिले आहे.घटनेबाबत व अर्जावर चर्चा झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ जेवढे शक्य असेल तेवढे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास लोणीच्या पोलीस उपनिरीक्षकांना सांगितले व घटनेचा तपास सायबर विभागामार्फत करणार असल्याचे आश्वासनही जवरे यांना दिले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!