पोरा बाळांच्या टीकेवर नका बोलू,पण जनतेचे तर प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.सुजय विखे यांचा नाव न घेता थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-
आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ द्या,असा खोचक टोला मा.खा. सुजय विखे यांनी मा.आ.बाळासाहेब थोरात यांना त्यांचे नाव न घेता लगावला.राहाता तालुक्यातील मोरवाडी येथे निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन मा. खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार तसेच पेढे तुला करण्यात आली. डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या सत्काराबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रमास वाल्मीक मोरे, संजय चोळके, सविता चोळके, सुनीता मोरे, मनीषा मोरे, निलेश मोरे, नंदू शेळके, मीनानाथ दरेकर, धोंडीराम मोरे, रायबली मोरे, राजेंद्र पठारे, संतोष गोरडे, नंदू गव्हाणे तसेच शासकीय अधिकारी, गावातील ग्रामस्थ आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम रक्षाबंधनाच्या दिवशी ठरवण्यात आल्याने गावातील बहिणींना डॉ. विखे पाटील यांनी राखीपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की,लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक भागात पाणी पोहोचवण्याचे पाहीलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे यश आज पाहायला मिळत असून, शिर्डी मतदार संघातील  प्रत्येक गावात  जलपूजन करण्याचा आनंद खूप मोठा आहे.

2009 ते 2014 या काळात मोरवाडीत मतदान होत नव्हतं. पाणी मिळाल्याशिवाय मतदान करणार नाही, असा इथल्या ग्रामस्थांचा निर्धार होता. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर या भागात पाणी आणण्यात यश आलं. याचे श्रेय स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासाला जातं.”ते पुढे म्हणाले, निळवंड्याचं पाण्याचे”हे यश मिळवण्यात स्वर्गीय पिचड साहेब यांचे सहकार्य मोलाचे होतेच, पण  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून केलेव्या पाठपुराव्याचे योगदान महत्वपूर्ण आहे. ‘पहिले दहा किलोमीटर कालवा पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही’ असा ठाम निर्णय महायुती सरकारने घेतल्यामुळेच अशक्य वाटणारे काम शक्य केलं.माझं काम म्हणजे युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना हमीभाव, दुधाला योग्य दर मिळवून देणं. सत्ता आली-गेली तरी काम सुरू राहायला हवं. सर्वसामान्य लोकांचे आपण कामे केली पाहिजेत वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना आपण प्रत्येक घरोघरी पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. मोरवाडी पंचक्रोशीतील गावांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून  “पाणी आपल्या गावात कधी येईल का या प्रश्नाला उतर मिळाल आहे. 40 वर्षांची प्रतीक्षा संपली. मंत्री   विखे पाटील आणि डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरवाडी पंचक्रोशीतील गावांना पाणी आले. विखे परिवाराचे आम्ही कायम ऋणी राहू,” असे भावनिक उद्गार गावाच्या सरपंच सविता चोळके यांनी काढले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

पोरा बाळांच्या टीकेवर नका बोलू,पण जनतेचे तर प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.सुजय विखे यांचा नाव न घेता थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ द्या,असा खोचक टोला मा.खा. सुजय विखे यांनी

पुणे- नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर स्टेशनला थांबा द्या;आ.हेमंत ओगले यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-नव्याने चालू झालेल्या पुणे - नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सदर पत्रात नमूद

श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार

सैनिकांसाठी पाठविल्या ११ हजार राख्या;श्रीरामपूरच्या सौ.पूजा चव्हाण यांचा उपक्रम

श्रीरामपूर-देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक

दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व नोकरी करिता बॅटरीवरील सायकल प्रदान;मा.खा.डॉ.सुजय विखे यांचे विशेष सहकार्य

श्रीरामपूर-डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्यामार्फत आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या विशेष सहकार्यामुळे आज श्रीरामपूर येथील कु.दर्शना पापडीवाल या दिव्यांग

सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ परत;नेवासा पोलीसांनी विधिवत केले परत

श्रीरामपूर-नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ संबंधितांना नेवासा पोलीसांनी मंगळवारी परत केले.रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२ हजार ४०० रुपये किमतीचे पितळी

Latest News

Trending News