श्रीरामपुर-
टाकळीभान टेलटॅंक परिसरात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे . श्रीरामपूर तालुक्याच्या टाकळीभान व परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटॅंकचे शासकीय जलपूजन आ. ओगले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कमी पर्जन्य हा चिंतेचा विषय असून धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे टाकळीभान टेलटॅंक पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न मार्गी लागणार असल्याचे म्हटले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की, पाटचाऱ्या दुरुस्त करणे आवश्यक असून आमदार हेमंत ओगले यांनी पाट चाऱ्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली असल्याचे सांगीतले. सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, डॉ वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, मांजाबापू थोरात, विलास दाभाडे, भारत भवार, जलसंपदा विभागाचे संजय कल्हापुरे, बाबासाहेब तनपुरे, ऍड प्रमोद वलटे, एकनाथ पटारे, तुकाराम बोडके, सोमनाथ पाबळे, काकासाहेब रणनवरे, गाधे काका, अनिल माने, शाखा अभियंता मारवाडी, शेख, कालवा निरीक्षक तनपुरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
