बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-
बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार ‘मियावाकी’ या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांनी दिली.                  
मियावाकी वृक्षारोपण ही एक खास जपानी पद्धत आहे. जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीत, स्थानिक झाडांच्या प्रजाती वापरून, नैसर्गिक वनीकरणाच्या तत्त्वांवर आधारित जंगल तयार केले जाते.  एका चौरस मीटरमध्ये २ ते ४ झाडे लावली जातात ज्यामुळे झाडे एकमेकांशी  स्पर्धा करून वाढतात. स्थानिक झाडांच्या प्रजाती वापरल्यामुळे नैसर्गिक अधिवास तयार होतो.कमी जागेत दाट आणि जलद वाढणारे जंगल तयार होते.या प्रकल्पांतर्गत वड,चिंच,जांभूळ,पिंपळ,आंबा,
डाळिंब, शेवगा,बेल,पेरु,सिताफळ,रातराणी,देवचाफा, बोगनवेल,मोगरा, पारिजातक,शमी आदि सावलीचे वृक्ष, फळझाडे,फुलझाडे आदिंची लागवड केली जाणार आहे. त्याच प्रमाणे ५ गुंठे क्षेत्रावर अडुळसा, शतावरी,तुळस यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींची देखील लागवड केली जाणार आहे. सदरचा प्रकल्प राबविणेसाठी  श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के,कृषी अधिकारी उस्मान शेख, कृषी विस्तार अधिकारी सुवर्णा तोडमल व दीपक मेहरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.हा उपक्रम राबविणेसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे व बेलापूर ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी विशेष परिश्रम घेत असल्याची माहिती सरपंच सौ.साळवी व उपसरपंच  श्री.नवले यांनी दिली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ.

Latest News

Trending News