मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-
कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितली.जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते.अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरले.याचा आनंद मंत्री विखे पाटील यांनी जलपूजन करून व्यक्त केला.धरणावर येवून त्यांनी नाथसागराची खणानारळाने ओटी भरून गोदामातेची आरती केली. यावेळी सायरन वाजवून पाणी सोडण्याची औपचारिक प्रक्रीयाही त्यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आली.अनेक वर्षानंतर जुलै महीन्यातच नाथसागर भरण्याचा हा क्षण लाभक्षेत्राला यंदा अनुभवता आला याचे समाधान असल्याचे उद्गार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी काढले.याप्रसंगी आ.हिकमत उढाण,आ.विजयसिंह पंडीत, आ.रमेश बोरनारे, आ.विलास बापू भुमरे,आ.विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता अरूण नाईक, सुनंदा जगताप, मुख्य अभियंता राजीव मुंदडा,सभापती राजू भुमरे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादापाटील बार्हे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणाच्या पाण्याचे जलपूजन करत नाथसागराची खणा नारळाने ओटी भरली.

ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,या धरणामध्ये माझ्या बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्यानंतर खिर्डी गावाला भेट देण्याचा योग आला. धुळे येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होतो तेव्हा सायकलवर नाथसागर पाहायला कसे आलो आणि जाताना बसवर सायकली टाकून कशा नेल्या हेही त्यांनी यावेळी सांगितले.पंतप्रधान इंदिरा गांधी याठिकाणी आल्या तेव्हा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार येथे झाला.मुख्यमंत्री असलेले स्व.शंकरराव चव्हाण आणि तेव्हाचे पाटबंधारे मंत्री बी.जे.खताळ यांच्यासह अनेकांच्या असलेल्या उपस्थीतीलाही त्यांनी उजाळा दिला.भविष्यात पाण्याचे संघर्ष आपल्याला संपवायाचे आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प महायुती सरकारने केला आहे.आता उल्हास खोऱ्यातील पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी महायुती सरकारने आरखडा तयार केला असून त्यावर काम सुरू झाले.केवळ सर्व्हेक्षणासाठी ६० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरदूत केली असून नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय नासिक येथे सुरू होत असल्याची माहीतीही त्यांनी दिली.डाॅ.बाळासाहेब विखे पाटील आणि डॉ.गणपतराव देशमुख या दोघांचे स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व आपल्यावर सोपविले गेले असल्याने ते पूर्ण करण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री म्हणून घेतली असल्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.या परीसारातील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास जलसंपदा विभागाच्या माध्यामातून करण्यात येणार असून अन्य काही प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करणार आहे.आ.विलास बापू भुमरे म्हणाले की नाथसागराचे जलपूजन करणारे पहीले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे ठरले आहेत.या भागातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला ३०२ कोटी रूपये मंजूर केल्याबद्दलही त्यांनी आभार मानले.

कार्यक्रम सुरू असताना शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेल्या घोषणाबाजीची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधींनीना बोलावून घेत सभेच्या ठिकाणीच प्रश्नाबबात चर्चा केली आणि जिल्हाधिकरी स्वामी यांना त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Comment

संबंधित बातम्या

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ.

Latest News

Trending News