आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-
मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात या सर्वांना अडकवून ठेवून भगवा दहशतवाद असतो,असे दाखवण्याचा काही जणांनी प्रयत्न केला.परंतु आज त्या सर्वांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.त्याबद्दल न्यायालयाचेही महंत रामगिरी महाराज यांनी आभार मानले.देवगाव शनी व सप्तक्रोशीत गोदावरी नदीतीरी सुरू असलेल्या सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या प्रवचन पुष्पावर ते बोलत होते.महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की,न्याय मिळाला परंतु दुर्दैव हे आहे की तो मिळवण्यासाठी त्यांना 17 वर्ष वाट पाहावी लागली.तसेच अपराध नसतानाही त्यांना 9 वर्षे तुरुंगात राहावे लागले.साध्वी प्रज्ञासिंह यांना प्रताडणा सहन करावी लागली.या प्रकरणाच्या पाठीमागे असलेल्या राजकीय नेत्यांनी हिंदू देखील आतंकवादी असतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

महंत रामगिरी महाराज

भगवा आतंकवाद शब्द वापरण्याचा प्रयत्न केला.अशा राजकीय लोकांपासून आपण सावध असले पाहिजे.हिंदू धर्म कधीही कुणावर अन्याय करत नाही.तसेच केलेला अन्याय सहनही करत नाही.त्यामुळे भगवा आतंकवाद हा शब्द ज्यांनी वापरला होता त्यांना माझा प्रश्न आहे की,पहलगाम मध्ये जेव्हा धर्म विचारून आतंकवाद्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली त्यांना तुम्ही हिरवा आतंकवाद म्हणू शकता का,ती हिम्मत तुमच्यात आहे का?भगवा आतंकवाद शब्द तुम्ही वापरता मग हिरवा आतंकवाद शब्द वापराल का?
सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी  सप्ताहाच्या माध्यमातून मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे.या गोष्टींनी आपली चित्ताची शुध्दी होत असते.आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.भागवत गीतेच्या 11 व्या अध्याय वरील 54 व्या श्लोकावर विवेचन करताना महाराज म्हणाले की,ज्ञानी भक्त भगवंताकडे प्रेम मागतो तर जिज्ञासू उदारता मागतो, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो.सकाळी देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी सप्ताहस्थळी भेट दिली. याप्रसंगी शिवशाहीर विजय महाराज तनपुरे, डवाळा आश्रमाचे भरत महाराज, मंहत सोमेश्वर महाराज जालना,जनार्दन महाराज मेटे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगानंद महाराज,विक्रम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्या सह 3 ते 4 लाख भाविकांची उपस्थिती होती.दिवसभर आमटी भाकरीच्या महाप्रसाद सुरू होता.

178 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या प्रवचन पुष्पावर उपदेश करताना महंत रामगिरी महाराज.

Leave a Comment

संबंधित बातम्या

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ.

Latest News

Trending News