श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागेची अधिकाऱ्यांसमवेत आ. हेमंत ओगले यांनी पाहणी करून कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.गेल्या आठवड्यात आ.ओगले यांनी श्रीरामपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.सदर बैठकीमध्ये वनविभाग, भूमीअभिलेख आणि श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया सदर जागेची स्थळनिश्चिती करणे करिता अधिकाऱ्यांना समक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज आ. हेमंत ओगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, वनविभागाचे निलेश रोडे, भूमी अभिलेख कार्यालयाचे खरोटे, नगररचना विभागाच्या सुचिता शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सदर स्मारकाची जागा वन विभागाची असून वन विभागाने तातडीने भूमी अभिलेख कार्यालयाकडे जागा निश्चितीचा अहवाल सादर करावा. जेणेकरून पुढील कार्यवाही करणे सोयीचे होणार असून यामुळे सदर स्मारकाला जवळपास अडीच गुंठे इतकी जागा मिळणार आहे.डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक तयार होऊन पूर्णकृती पुतळा साकारणार असल्याचे आ. ओगले यांनी म्हटले.यावेळी भीमशक्तीचे संदीप मगर, माजी सरपंच सुनील शिरसाठ, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण, माजी नगरसेवक रितेश रोटे, राजेंद्र सोनवणे,के.सी शेळके, अशोकभाई बागुल, प्रवीण नवले, सुनील मगर, सुहास राठोड, रितेश एडके, वैभव पंडित, किरण खंडागळे, मोहन आव्हाड, सुरेश जगताप, मनोज काळे, अंतोन शेळके, सोमनाथ पटाईत, आसाराम पोटभरे, आकाश शेटे, मच्छिंद्र ढोकणे, सचिन राठोड, पी जी सावंत, इंगळे साहेब, मस्के साहेब, रियाज खान पठाण, अमोल आवटी, संजय गोसावी, राजेश जोंधळे, सागर दुपाटी यांच्यासह आदी उपस्थित होते.
