गोदावरीच्या पवित्र तिरावर ज्ञानदान,अन्नदानाने भाविकांची त्रुप्ती-महंत रामगिरी महाराज;गंगागिरी महाराज 178 वा सप्ताह-पुष्प पहिले

श्रीरामपूर-
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्य भुमिमध्ये गंगागिरी महाराज यांचा सप्ताह होत आहे  गोदावरी तीरी आपण प्रयागराज मंहाकुभाची अनभुती घेत आहेत सप्तहाच्या माध्यमातून भक्ती,ज्ञान व अन्नदानाचा एकप्रकारे महायज्ञच असतो व आपण सर्व त्या परमात्म्यासाठी हा तपस्या यज्ञ करत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.श्री क्षेत्र शनिदेव गाव शिवारातील गोदातीरी माळावर आयोजित सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज १७८व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीचे  दिवशीचे प्रथम प्रवचन पुष्प गुंफतानी ते बोलत होते .सुमारे तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत भगवतगितेच्या 11 व्या अध्यायातला  54 श्लोकावर बोलताना महाराज म्हणाले की,.मन बुद्धीच्या पलीकडे असते,प्रत्येकाच्या आवडी भिन्न ,संस्कार भिन्न आहे ,जगातील सर्वात पवित्र वस्तू ज्ञान आहे ज्ञान हे प्राप्त करता येत नसून ते अंतरंगातून प्रकट होत असते.हे शास्त्र सांगते,परमात्मा हा अणु- रेणू पेक्षा लहान तर विचार केल्यास आकाशा एवढा मोठा आहे .बुद्धी व ज्ञानाची देवता असलेल्या गणेशाबद्दल समाजात गैरसमज पसरविले जात आहे .परंतु सबका मलीक एकच परमात्मा आहे.

दुसऱ्याचे ऐकून घेण्याची क्षमता ज्यांच्यात नसते ते जीवनात कधीच मोठे होऊ शकत नाही .ज्ञान प्राप्ती साठी चित्तशुध्दीची गरज असते,त्यासाठी कामना विरहीत मन करावे ,मनाला सुमन बनवावे म्हणजे परमात्मा आपल्या आंतरंगात वास करेल ,प्रत्येक जीवाच्या ह्दयात राहून भगवंत त्याच्या कर्मानुसार त्याला फिरवत असतो,असे महाराज म्हणाले . कली युगात आपल्याला वनात जाऊन हजारो वर्ष तप करणे शक्य नसते म्हणूनच सर्वसामान्य जिवाने सप्ताहातील ज्ञानदान यज्ञदान अन्नदान या परंपरा अनुभवल्या पाहिजे त्यासाठी योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांच्या सानिध्यात यावे लागेल या गोदातीरी प्रमुख प्रभू रामचंद्राने अभयारण्यात वास्तव्य केले त्याच गोदा दामात योगिराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यासारख्या संताच्या सानिध्यात आपण ज्ञान यज्ञ अन्नदान यासारख्या परंपरा पुढे नेत आहोत येथील आनंद भक्ती अध्यात्म ज्ञानदान अन्नदान भक्तिमय वातावरण पाहून पंढरीचा पांडुरंग ही आज पंढरीत  नसून या ठिकाणीच वास करत असेल असे महाराज म्हणाले.याप्रसंगी गणेश आश्रमाचे विष्णु गिरी महाराज,ज्ञांनानंदगिरीजी महाराज,चैतन्यनंदगिरीजी महाराज,विश्र्वनाथगिरीजी महाराज,राजेश्र्वरगिरीजी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज,यांच्यासह लाखो भाविकांची उपस्थिती होती.

Leave a Comment

संबंधित बातम्या

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ.

Latest News

Trending News