श्रीरामपूर-
श्रीरामपूरमधील भाजपाचे हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश चित्ते यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे केली.यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, संबंधित फिर्यादीने रात्री पावणेआठ वाजता दिलेल्या एका फिर्यादीमध्ये ना प्रकाश चित्ते यांचे नाव होते, ना जातीयवाचक शब्दांचा उल्लेख होता. मात्र, त्यानंतर रात्री एक वाजता पुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या फिर्यादीत आठ-दहा दिवसांपूर्वीच्या काल्पनिक घटनांचा उल्लेख करून जातीय शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.पोलिसांनी कुठलीही प्राथमिक चौकशी किंवा शहानिशा न करता तातडीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारातून प्रशासनावर राजकीय दबाव होता तसेच यामागे मोठे कटकारस्थान होते हे स्पष्ट होते,असे सौ. दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी सांगितले.त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. जेणेकरून सत्य जनतेसमोर येईल अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
