श्रीरामपूर –
संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोळाव्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या “संविधान का बदलावे” या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखक व प्रकाशन सोहळ्याचे आयोजक यांच्यावर देशद्रोह (IPC कलम 124A) व इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनांक 26 जुलै 2025 रोजी नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवन येथे ॲड. शिवाजी कोकणे लिखित “संविधान का बदलावे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय संविधानाबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्यात आली तसेच संविधानाबाबत चुकीचा अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्या दोषींवर देशद्रोहाचा पुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात स्वरूपाचे मोठमोठे आंदोलन होतील याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. यावेळी राहुल शहाणे, एजाज पठाण,विशाल सुरडकर, अमोल काळे, विलास जाधव, श्रीराम निकुंभ, विशाल थोरात, आशिष मोरे, गणेश पालकर, गौस तांबोळी,योगेश जाधव, दादासाहेब बनकर, रमेश ढाकणे, अमित कुसुमकर,जावेद अत्तार, अविनाश सुपेकर,ताया शिंदे, प्रदीप निकुंभ, बिलाल आतार, मोजेस चक्रनारायण आधी उपस्थित होते.
