सराईत गुन्हेगारास सिनेस्टाईल पाठलाग करून गावठी कट्टयांसह पकडले;नेवासा पोलिसांनी केली कारवाई

श्रीरामपूर-नेवासा पोलिसांना मंगळवार दि. 29 जुलै रोजी पहाटे भेंडा फॅक्टरी जवळ दोन संशयित मोटरसायकलवर वेगात जाताना दिसून आले. दोघांपैकी एक जण...

श्रीरामपूर-
नेवासा पोलिसांना मंगळवार दि. 29 जुलै रोजी पहाटे भेंडा फॅक्टरी जवळ दोन संशयित मोटरसायकलवर वेगात जाताना दिसून आले. दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्या दोघा जणांना नांदूर शिकारी गावाजवळ गावठी कट्टयांसह जेरबंद केले.दोघांविरोधात भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर हकीकत अशी की, मंगळवार दि. 29 जुलै रोजी पहाटे नेवासा पोलिसांचे पोलीस वाहन पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ व चालक संतोष खंडागळे  रात्रगस्त करीत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भेंडा फॅक्टरी जवळ दोन संशयित मोटर सायकलवर वेगात जाताना दिसून आले. रात्रगस्तवरील पोलिस वाघ व खंडागळे यांना संशय आल्याने त्यांनी मोटर सायकल थांबवण्याचा प्रयत्न केला असता कट मारून मोटर सायकल चालक कुकाण्याकडे वेगाने निघून गेला. त्यावेळी असं लक्षात आले की दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यानंतर तातडीने नाकाबंदी सुरू करून रात्रगस्तवरील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना नांदूर शिकारी गावाजवळ पकडले.

दोघांकडे चौकशी केली असता सचिन रमेश पन्हाळे, वय 25 वर्ष व आदित्य संतोष जाधव,वय 21 वर्ष,दोन्ही राहणार शेवगाव असे त्यांनी आपली नावे सांगितली. पाठलाग करीत असताना दोघांनी हातातून काही तरी फेकल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता काहीही फेकले नाही असे सुरुवातीला त्यांनी सांगितले. परंतु पोलीसी खाक्या दाखवताच दोन गावठी कट्टे फेकल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शोध घेतला असता दोन देशी कट्टे मिळून आले. सदर कट्ट्या बाबत विचारपूस केली असता सदरचे कट्टे मध्यप्रदेश येथून आजच खरेदी करून आणल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीकडून 20 हजार रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यांसह एक टीव्हीएस स्टार मोटर सायकल, दोन मोबाईल असा एकूण 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत दोन्ही आरोपींवर पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत.सचिन पन्हाळे यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाणे शेवगाव, एमआयडीसी व नेवासा येथे दंगल घडवुन आणणे, अग्नीशस्त्र बाळगणे, जंगली प्राण्यांची तस्करी करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत. सचिन पन्हाळे यास मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अग्नीशस्त्र हवेत मिरवताना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस रिमांडकामी आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे, पोलीस हवलदार शहाजी आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष खंडागळे, वाल्मीक वाघ, नारायण डमाळे, वासुदेव डमाळे व गणेश जाधव यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!