श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात लवकरच सन्मानपूर्वक उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला गुरुवार दिनांक २४ जुलै रोजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध मूर्तिकार शरद मैद यांनी या भव्य ब्रांझ धातूच्या पुतळ्याची निर्मिती केली असून, हा पुतळा लवकरच श्रीरामपूर शहरात उभारण्यात येणार आहे.महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समवेत फोटो व पहिल्यांदाच पुष्पहार अर्पण केल्यामुळे भीमअनुयायांचा आनंद गगनात मावला नाही. यावेळी भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे जय भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे, वंचितचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, रिपाईचे तालुका संघटक संजय बोरगे, पीपल्स रिपब्लिकन चे तालुका अध्यक्ष संतोष मोकळ, रिपाईचे युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, वंचित चे किशोर ठोकळ बहुजन क्रांती सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल काळे, रिपाईचे प्रदीप गायकवाड,बहुजन टायगर फोर चे अध्यक्ष संजय रूपटक्के, समता सैनिक दलाचे दादासाहेब बनकर आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या वतीने सामूहिक भीमस्तुती पठण करण्यात आली. तसेच त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध मूर्तिकार मैद यांचा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी हार घालून सत्कार केला. तसेच भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूरला नेण्यासंदर्भात सखोल चर्चा झाली.या ऐतिहासिक क्षणी भिमानुयायांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पुतळ्याच्या स्थापनेची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.श्रीरामपूर शहरामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येणार असून, श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या स्मारकामुळे सामाजिक न्याय व बंधुतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.
