जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून विकसित करा-जलसंपदा मंत्री विखे पाटील;राज्यशासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमाचा शुभारंभ

श्रीरामपूर –
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या भंडारदरा व निळवंडे धरण परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून त्या जागा विकसित करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.राज्य शासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जलसंपदा विभागाने सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भंडारदरा येथे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी आ. डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे,नाशिकचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, निळवंडे प्रकल्प अभियंता प्रदीप हापसे, गणेश हारदे आदी उपस्थित होते.भंडारदरा धरणाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त जलसंपदा विभागामार्फत पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विभागाच्या ताब्यातील विविध जागांची त्यांनी पाहणी करून विकासाच्या दृष्टीने सूचना केल्या.गेल्या काही वर्षांत अतिक्रमण झाल्यामुळे विभागाच्या जागांचा उपयोग होऊ शकला नव्हता. सध्या मराठवाडा व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील धरण परिसरातील जागा पर्यटनासाठी विकसित करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने स्वीकारले आहे. रंधाफॉल परिसरातही अशाच प्रकारे पर्यटनविकासाचे नियोजन करण्यात आले आहे,असेही ना. विखे पाटील म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News