श्रीरामपूर –
श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या जागेचे काम ८ दिवसांत पूर्ण करून ते तातडीने महसूलमंत्र्यांकडे पाठवावे, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवार दि.२३ जुलै रोजी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपवनसंरक्षक साली विठ्ठल, उपअधीक्षक भूमिअभिलेख रवींद्र खराटे, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्षे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले की,
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. आता हे काम अधिक विलंब न करता आठ दिवसांत मार्गी लागले पाहिजे.स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की, ही जागा वनविभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अनेक अडचणी आल्या. मात्र त्या अडचणींवर मात करून सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केली असून आता या ऐतिहासिक स्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. हे काम माझ्या हातून घडत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच माझ्या कामाला खासदार सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच इतक्या दिवस झोपी गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणे बंद करावे. सत्ता भाजपाची आहे. हे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी आपला देखावा बंद करावा,असेही त्रिभुवन यांनी म्हटले आहे.
इतक्या दिवस झोपी गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा करणे बंद करावे. सत्ता भाजपाची आहे. हे काम पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी आपला देखावा बंद करावा,असेही सुभाष त्रिभुवन यांनी म्हटले आहे.