श्रीरामपूर –
देश विदेशातल्या साईभक्तांच्या अलोट गर्दीने फुललेले
शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी ई मेलद्वारे प्रशासनाला आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साई बाबा मंदिर ट्रस्टने या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ई-मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात तपासणी करत आहेत.शिर्डीच्या साईं मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देशाबरोबरच परदेशातूनही लोक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. त्यामुळे येथे सुरक्षेची चोख व्यवस्था असते. शिर्डीत साईभक्तांची नेहमीच मोठी गर्दी असते. दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना तपासणीनंतरच प्रवेश दिला जातो. दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारावर साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी पुरुष आणि महिला दोघांचीही कडक तपासणी करतात. अशात मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने पोलिस आणि प्रशासन तपास कार्यात लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवंत मान नावाच्या व्यक्तीने शिर्डीच्या साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ईमेल आयडीवरून समोर आले आहे. धमकीचा ईमेल मिळताच शिर्डी साईबाबा मंदिर ट्रस्टने तातडीने स्थानिक शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. bhagvanthmannyandex.com या ईमेल आयडीवरून भागवत मान नावाच्या व्यक्तीने धमकी दिली आहे. साई मंदिर समाधी स्थळ आणि द्वारकामाईमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.सध्या शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धमकी कोठून आली? ती खरी की खोटी? याचा तपशीलवार शोध घेतला जात आहे. संपूर्ण मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ई-मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात तपासणी करत आहेत.