श्रीरामपूर-
योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहीला.भविष्यातही जिल्ह्याच्या विकास प्रक्रीयेचा वेग कायम राहण्यासाठी सुसंवादाने अधिक चांगले काम करण्याची अपेक्षा जिल्ह्याच्या विकासाचे व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्याने रुजु झालेले तसेच बदलून गेलेल्या आधिका-यांचा सन्मान सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहसंवाद मेळाव्यात त्यांनी जिल्ह्यात विकास प्रक्रीयेची सुरु असलेली वाटचाल तसेच अगामी काळात जिल्ह्याच्या विकासाचे उदिष्ठ पुर्ण करण्यासाठी कराव्या लागणा-या निर्णयांची माहीती त्यांनी दिली.या प्रसंगी आ.विठ्ठलराव लंघे,आ.विक्रमसिंह पाचपुते, साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, अतिरीक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, आयुक्त यशवंत डांगे, शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रमातून सुमारे २५ लाख लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले देता आले. लाडकी बहीण योजनेची सुमारे १३ लाख महिलांनी केलेली नोंदणी, घरकुल योजनेची यशस्वी अंमलबजावणी यांसह अन्य विभागांनीही त्यांच्या स्तरावर केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे राज्यात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर राहीला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणाचे लोकार्पण आणि शासन आपल्या दारी उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमाची आठवण सांगताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, त्याच दिवशी राज्यात आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलने सुरु होती. या तणावाच्या परिस्थितीत कार्यक्रम कसा होणार असा प्रश्न सर्वांच्याच समोर होता. परंतू आधिका-यांचे सहकार्य आणि नागरीकांनी दाखविलेल्या उपस्थितीमुळे हा ऐतिहासिक कार्यक्रम होवू शकला,असे ना. विखे पाटील म्हणाले.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सध्या जिल्ह्यात प्रशासनाकडून सुरु असलेल्या विकास कामांबाबत माहीती दिली. साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांनी मंत्री विखे पाटील यांच्या प्रशासनाशी असलेल्या सुसंवादाचे कौतूक करुन, या जिल्ह्यामध्ये विकासाच्या खुप संधी आहेत. विकासाचा विचार करुन, काम करणारे नेतृत्व आहे.माझ्या ३२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत अनेक जिल्ह्यात काम केले पण असा अधिकारी वर्गाचा सन्मान प्रथमच अनुभवता आला. विखे पाटील परिवाराच्या वतीने सर्व आधिका-यांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
