‘अशोक’ दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव संस्था-मा.आ.कांबळे; डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजचे उद्घाटन संपन्न

श्रीरामपूर- दर्जेदार शैक्षणिक संधी आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध करण्यासाठी ‘अशोक’ कायम प्रयत्नशील आहे. नावारूपास आलेली ही संस्था पदवीचे परिपूर्ण शिक्षण देण्यास...

श्रीरामपूर-  
दर्जेदार शैक्षणिक संधी आपल्या ग्रामीण भागात  उपलब्ध करण्यासाठी ‘अशोक’ कायम प्रयत्नशील आहे. नावारूपास आलेली ही संस्था पदवीचे परिपूर्ण शिक्षण देण्यास तत्पर असल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखाना संचलित अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी पदवी) चा उद्घाटन समारंभ माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, अशोक कारखान्याचे विद्यमान व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी व्हा. चेअरमन हिम्मतराव धुमाळ, माजी चेअरमन सुरेश गलांडे, ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात,  माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके,  कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, संचालक ज्ञानेश्वर काळे, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर शिंदे, आदिनाथ झुराळे, माजी संचालक काशिनाथ गोराणे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात माजी आ.श्री. कांबळे पुढे म्हणाले की, बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला तांत्रिक व्यवसायिक शिक्षणाची जोड देण्याकरीता संस्थेचे संस्थापक भानुदास मुरकुटे यांनी या अशोक कारखान्यामार्फत शैक्षणिक संकुलाची उभारणी केली आहे. याप्रसंगी श्री. छल्लारे यांनी सांगितले की, चांगले दर्जाचे उच्च शिक्षण, तंत्र शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठीच्या प्रयत्नांमध्ये श्री. मुरकुटे यांनी कोणतीही कसर सोडली नाही. ज्यामुळे तांत्रिक शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यात झालेली फलनिष्पत्ती दिसून येते.माजी आ.श्री.मुरकुटे म्हणाले की, तांत्रिक शिक्षण हा पदविका आणि पदवी अभ्यासक्रम हे माध्यम शिक्षणाच्या प्रवाहातील बहुस्वीकृत मार्ग आहे. या अशोकच्या संस्थामध्ये पायाभूत सुविधा, मूलभूत शिक्षण, व्यावसायिक ज्ञान व उच्च स्तरावर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भविष्यात पात्र व सक्षम अभियंते निर्माण करणे हे अशोकचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे सहसचिव विरेश गलांडे यांनी केले. या कार्यक्रमास  सिद्धार्थ मुरकुटे,  दत्तात्रय नाईक, संचालक ज्ञानदेव पटारे, रामभाऊ कसार, अमोल कोकणे, निरज मुरकुटे, अच्युतराव बडाख, मयूर पटारे, आदींसह पालक, सभासद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डॉ. मोहितकुमार गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन अरुण कडू व दिलीप खंडागळे यांनी केले. कार्यक्रमास पॉलिटेक्निकचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी पदवी) च्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना माजी आ. भाऊसाहेब कांबळे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!