श्रीरामपूरच्या सोनाराचे दुकान फोडणारे 4 आरोपी जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;जालन्यातुन आरोपींना अटक;11 किलो चांदीसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर –
श्रीरामपूर येथील रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स हे सोनाराचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जालना येथून  अटक केली आहे. या चौघांकडून चोरी झालेल्या 11 किलो चांदीसह 14 लाखांचा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी  निखील विजय नागरे, वय 34, धंदा सराफ (रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स) रा.सद्गुरूकृपा, सावता रोड, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर हे दि. 17/07/2025 रोजी रात्री 20.30 वा.सराफ दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरटयांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ड्रॉवर व कपाटामधील सोन्याचे दागीने व चांदीचे दागीने, लगड असा एकुण 26,59,745 रू. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत ची फिर्याद श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल केली होती. सदर वरून पोलिसांनी गु.र.नं. 681/2025 बीएनएस कलम 305 (अ), 331 (4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला.पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने पोनी. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे पथक तयार करुन पथकास रवाना केले.  पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून नमूद गुन्हा हा गोपीसिंग टाक, रा.जालना व शिवाजी प्रल्हादराव सासनिक, रा.जालना अशांनी तयांच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. दिनांक 22/07/2025 रोजी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून जालना तालुका पोलीस स्टेशन, जि.जालना येथे जाऊन जालना तालुका पोलीस स्टेशन येथील पोहेकॉ दत्तात्रय साळुबा मेहत्रे यांच्या मदतीने संशयीत आरोपीचा शोध घेऊन  गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक, वय 25, दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक, वय 28 दोघे रा.सिध्दार्थनगर, ता.जि.जालना मुळ रा.गुरूगोविंदसिंगनगर, शिकलकरी मोहल्ला, टाक हाऊस, जालना, शिवाजी प्रल्हादराव सासनिक, वय 36, रा.रेणुकामाता मंदिराजवळ, गांधीनगर, जालना,अमित नंदलाल दागडिया,वय 32, रा.खरपुडी रोड, हरीगोविंदनगर, जालना यांना ताब्यात घेतले.

श्रीरामपूर येथील  सोनाराचे दुकान फोडून चोरी आरोपींकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने 11 किलो चांदीसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यातील आरोपीकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक याने त्याचे वरील साथीदारासह दि.17/07/2025 रोजीचे रात्री त्याच्याकडील होंडा कारमधुन जाऊन श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर येथे सोनाराचे दुकानामध्ये चोरी केल्याचे कबूल केले.पोलिसांनी 14 लाख 7 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. होंडा कंपनीची सीटीझेड एक्स कार क्रमांक एमएच-03-एझेड-5458, 5 मोबाईल, 11 किलो 230 ग्रॅम चांदीचे दागीने व लगड, 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ताब्यातील आरोपी दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक याच्यावर जालना जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला यापुर्वी दरोडा तयारी, घरफोडी व चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ.

गोदावरीच्या पवित्र तिरावर ज्ञानदान,अन्नदानाने भाविकांची त्रुप्ती-महंत रामगिरी महाराज;गंगागिरी महाराज 178 वा सप्ताह-पुष्प पहिले

श्रीरामपूर-प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्य भुमिमध्ये गंगागिरी महाराज यांचा सप्ताह होत आहे  गोदावरी तीरी आपण प्रयागराज मंहाकुभाची अनभुती घेत आहेत सप्तहाच्या माध्यमातून भक्ती,ज्ञान व अन्नदानाचा एकप्रकारे महायज्ञच असतो व आपण

Latest News

Trending News