श्रीरामपूर-
अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथे सुरू असलेला माव्याचा कारखाना काल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने उद्धवस्त केला. या कारवाईत ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 5 आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.शुभम दत्तात्रय हजारे हा आनंदनगर,नवनागापूर येथील अमोल सप्रे याच्या बिल्डींगच्या टेरेसवर पत्र्याच्या शेड मध्ये सुगंधीत तंबाखू, सुगंधीत तंबाखू, सुपारी, चुना पावडरव्दारे मशीनवर मावा तयार करत असल्याची खबर विशेष पथकाला लागली होती. त्यानुसार छापा टाकला असता त्या ठिकाणी सुगंधीत तंबाखू त्यामध्ये सुपारी टाकून मावा इलेक्ट्रीक मशीनवर तयार करताना काहीजण दिसून आले. या ठिकाणाहून ०५ जणांना ताब्यात घेण्यात आले. शुभम दत्तात्रय हजारे वय- वर्षे रा. केडगाव, ता. जि. अहिल्यानगर, मंजितकुमार विजयकुमार सिंग वय-३८ वर्षे रा. आरा जि. भाजपुर राज्य-बिहार, हल्ली रा. आनंदनगर, नवनागापूर, एमआयडीसी, ता. जि. अहिल्यानगर, आकाश बाळासाहेब शिरसाट वय-२५ वर्षे नगर, नवनागापूर ता.जि. अहिल्यानगर मूळ रा. चांदा ता. नेवासा जि. अहिल्यानगर, प्रशांत अशोक नवथर वय-२७५ वर्षे रा. पिंपरी शहाली ता. नेवासा जि. अहिल्यानगर, महेश देविदास खराडे वय-२२ वर्षे रा. जेऊर हेबती ता. नेवासा जि. अहिल्यानगर अशी आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी शुभम हजारे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने तयार मावा हा कारमध्ये ठेवल्याचे सांगितले. या कारवाईत ८ लाख ७६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोसई. राजेंद्र वाघ, पोहेकॉ. शंकर चौधरी, पोहेकॉ. दिगंबर कारखेले, पोहेकॉ. मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ. सुनिल पवार, पोहेकॉ. उमेश खेडकर, पोहेकॉ. अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ. दिनेश मोरे, पोकॉ. सुनिल दिघे, पोकॉ. अमोल कांबळे, पोकॉ. संभाजी बोराडे, पोकॉ. विजय ढाकणे, पोकॉ. दिपक जाधव यांच्या पथकाने केली आहे.
