श्रीरामपूर-
विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी करावी तसेच लातूर येथील छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली आज छावा संघटनेने श्रीरंप उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध केला आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर येथे राष्ट्रवादी प्रदेशअध्यक्ष यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक चा सुरज चव्हाण व त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी (मोकोका) कायद्या अंतर्गत कारवाई करावी.तसेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम मानहानीकारक वक्तव्य करणाऱ्या या कोकाटे ची मानसिक स्थिती तपासावी आणि आरामासाठी त्यांना पत्ते खेळण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र केबिन बनून द्यावी,
निवेदनावर नितीन पटारे पाटील (जिल्हाध्यक्ष) यांच्यासह शरद बोंबले पाटील (शहर अध्यक्ष) अक्षय पटारे, गोरख शेजुळ, राजू भिंगारे, निलेश बनकर, भाऊ गुंजाळ, प्रदीप पटारे, विजय सालालकर, बाबासाहेब भनगे, राहुल तारख, मयुर पटारे, दादा शेजुळ, रोहन पटारे, दिलीप भागडे, अमोल शितोळे , विशाल पटारे, सतीश बेल्हेकर, रोहित उंडे, विकास उंडे आदींची नावे आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
