श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी पकंज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने वन आणि भुमिअभिलेख विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना करत डी फॉरेस्ट नोटिफिकेशन नुसार वनविभाग आणि भूमी अभिलेख यांनी जागेवर प्रत्यक्षात पाहणी करुन त्याबाबतचे नकाशे तयार करण्यास सांगितले. तसेच दोन्ही विभागांना पत्र देण्याबाबत उपजिल्हाधिकारी, महसूल विभागालाही आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णकृति पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून तयार आहे. फक्त वनविभागाच्या ना- हरकत प्रमाणपत्र करीता सदर विषय प्रलंबित राहिला आहे. आता जिल्हाधिकारी यांनीच याबाबत आदेश दिल्यामुळे लवकरच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णकृती पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.सदर बैठकीकरिता जिल्हा बँक संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले, श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, वन विभाग आणि भूमी अभिलेख विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष संदिप मगर, दत्तनगरचे सरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, माजी सरपंच सुनील शिरसाठ, नगरसेवक कलीम कुरेशी, शंकरराव गायकवाड, युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत ओगले, निलेश नागले,अशोक लोंढे, सुहास राठोड, मोहन आव्हाड, सुनील मगर, रितेश एडके, मच्छिंद्र ढोकणे, मनोज काळे, वैभव पंडित, सुरेश ठुबे, किरण खंडागळे, सुरेश बनसोडे, सोमनाथ पटाईत, अतुल काळे, यांच्यासह आदीही उपस्थित होते.
