माळवडगाव-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार लहुजी कानडे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार लहुजी कानडे मित्रमंडळ, माळवाडगाव यांच्या वतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार’ या पक्षाच्या शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.यानिमित्त माजी आमदार लहुजी कानडे लिखित ‘चिंतन’ या पुस्तकाचा संग्रह कार्यकर्त्यांना तसेच हायस्कूलच्या वाचनालयास भेट म्हणून देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार लहुजी कानडे मित्रमंडळ, माळवाडगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २२ ते ३० जुलैदरम्यान “विजय संकल्प सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात व प्रभागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले स्वागत फलक लावले जात आहेत.वाढदिवसानिमित्त विविध विधायक कार्यक्रम घेऊन एक महिला व एक युवक कार्यकर्त्यास पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने माळवाडगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या नेत्याच्या वाढदिवसाचे हे औचित्य साधून संघटन मजबूत व्हावे, हा हेतू यामागे असून पक्ष संघटना बळकटीकरणसाठी या उपक्रमाचा लाभ होईल,असेही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
