श्रीरामपूर-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुका यांच्या वतीने श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय येथे ‘महा रक्तदान संकल्प’ शिबिर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात —- रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अनोख्या पद्धतीने यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.आज दि.22 रोजी सकाळी 10 वा या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या हस्ते संपन्न झाले.सकाळपासून शिबिरात महिला आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.शिबिरात अनेक माजी सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग नोंदवत या सामाजिक उपक्रमास पाठिंबा दिला.भाजपच्या वतीने राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराच्या सामाजिक उपक्रमाचे श्रीरामपूरकरांनी कौतुक केले आहे.यावेळी पक्षाच्या तालुका व शहरच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ तरस व भागचंद नवगिरे यांनी देखील रक्तदान केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,नानासाहेब पवार, मारुती बिंगले, संजय फंड, बंडूकुमार शिंदे, सतीश सौदागर,शरद नवले,अभिषेक खंडागळे,दीपक चव्हाण, श्रीनिवास बिहानी, आशिष धनवटे,संजय गांगड, वैशालीताई चव्हाण,अक्षय गाडेकर, श्रेयस जिरंगे, महेश सूळ, अनिकेत भुसे,सोमनाथ गांगड, मनोज लबडे, नितीन शेळके,भैरव कांगुणे, विजय आखाडे, विशाल अंभोरे,रुपेश हरकल,मंजुश्री ढोकचैळे,पूजा चव्हाण,पुष्पलता हरदास, गिरीधर आसणे, डॉ.शंकर मुठे, किशोर बनसोडे,रामभाऊ तरस, नारायण काळे,शिवनाथ आव्हाड,केतन खोरे,रवी पाटील, महेंद्र पटारे, दिलीप त्रिभुवन, अनिल भनगडे, आनंद चावरे, रामराव शेटे,अनिल भानगडे, राहुल पांढरे, भैय्या भिसे, गौतम उपाध्ये,सुप्रिया धुमाळ, योगेश ओझा, प्रतीक वैद्य, सुबोध शेवतेकर, तेजस उंडे, ऋषिकेश सुरडकर, रवी पंडित, मनीष कुलकर्णी, श्रेयस सुवर्णपाटकी, अमोल भोसले, संदीप भोसले, मंदार पावशे, महेश जोशी,आकाश दुबेया, अमोल शेटे, रवींद्र तुपे, साजिद शेख, आसीफबाई पोपटिया, पप्पू थोरात, प्रताप पठारे, विजय सदाफळ, सुनील ढोकचोळे, राजेंद्र जराड,अरुण काळे आदींसह मोठ्या संख्येने तालुका तसेच शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

‘महा रक्तदान संकल्प’ शिबिर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.