वृक्षारोपण चळवळीस पालिकेचे नेहमी सहकार्य – मुख्याधिकारी घोलप

श्रीरामपूर-
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे हरित श्रीरामपूर व सुंदर श्रीरामपूर चे स्वप्न साकार करण्यासाठी शहराचे विविध भागांमध्ये वृक्षारोपण चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेची नेहमी सहकार्य राहील . नागरिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास किंवा दाखविल्यास त्या ठिकाणी वृक्षारोपण पालिकेतर्फे करण्यात येईल यासाठी शहरवासीयांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले. मानवता संदेश फाउंडेशन व अहेबाब ए मिल्लत ग्रुप तर्फे संघटनेचे अध्यक्ष तथा श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचे साठाव्या वाढदिवसानिमित्त साठ वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त  गणेश शिंदे, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,पत्रकार महेश रक्ताटे, प्रदीप आहेर,नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख,राजे अलघ,श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक उपाध्ये,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री तोफिक शेख,श्री सोहेल शेख,हाफिज अशपाक पठाण,आयाज तांबोळी, लकी सेठी,शहर काजी मौलाना सय्यद अकबरअली वृक्ष चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते डॉ.सलीम शेख,पेन्शनर शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष श्री प्रकाश माने आदींच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मुख्याधिकारी घोलप बोलत होते.
ते पुढे म्हणाले की वृक्षारोपण हे एक सामाजिक कार्य समजून प्रत्येक नागरिकांनी वृक्षरोपणास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रत्येकाने वृक्षारोपण करावे पालिकेच्या संत गाडगेबाबा उद्यानामध्ये त्यासाठी मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या वर्षी देखील मिळत नगर कॅनल साईडला ५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते त्यापैकी ३५ झाडे आज जगली आहेत.या वृक्षांचे संगोपन होण्यासाठी वर्षभर झाडांची निगा राखून त्यांना पाणी देणारे तन्वीर शेख,खालील मोमीन हाजी अनिस शेख,अन्वर टेलर आदींचा उपायुक्त शिंदे व मुख्याधिकारी घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी बोलताना नगरसेवक अंजुमभाई शेख यांनी वृक्षारोपण चळवळीसाठी मानवता संदेश फाउंडेशन व अहबाब ए मिल्लत ग्रुपने दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करून भविष्यातही मिल्लत नगर भागामध्ये असेच सामाजिक कार्य सुरू ठेवावे त्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले.कार्यक्रमास अहेबाब ए मिल्लत ग्रुपचे सदस्य सर्वश्री हाजी इमाम सय्यद सर,हाजी अनिस शेख सर,सज्जाद हुसेन नवाब,सलीम रसूल पटेल,रिटायर्ड पीएसआय जाबीरभाई सय्यद,पंचायत समितीचे साधन व्यक्ती शाहीन शेख सर,प्राध्यापक मोहम्मद उमर बागवान सर,  तनवीरभाई शेख,खालीद मोमीन,बुरहानभाई जमादार,साजिद गुल मोहम्मद शेख,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जाकीर हुसेन सर,रज्जाकभाई पठाण, दीपक कदम,फिरोजखान पठाण सर,मोहम्मद आसिफ मुर्तुजा सर व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुरहानभाई जमादार, तन्वीर शेख,खालीद मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले.डॉ. सलीम शेख यांनी सर्वांचे आभार मानले.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते मानवता संदेश फाउंडेशन व अहेबाब ए मिल्लत ग्रुपच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News