श्रीरामपूर-
श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले यांनी पावसाळी अधिवेशनात येथील टिळकनगर इंडस्ट्रीजविषयी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करत दत्तनगर, टिळकनगर, एकलहरे आणि रांजणखोल येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या निषेधाचा भाग म्हणून ग्रामस्थांनी दत्तनगर- टिळकनगर चौफुलीवर आ.ओगले यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करून संताप व्यक्त केला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आमदार ओगले यांनी विधानमंडळात टिळक नगर इंडस्ट्रीजला बदनाम करण्याचा, आणि त्यामुळेच त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराचा निषेध करत रिपब्लिकन पक्षाचे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, तालुका संघटक संजय बोरगे तसेच जय भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे आणि राजू त्रिभुवन यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाआ. ओगले यांनी आपली विधानमंडळातील तक्रार त्वरित मागे घ्यावी आणि टिळकनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्याविरोधात अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.या आंदोलनानंतर ग्रामस्थांनी आपली मागणी असलेले निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय दीपक मेढे यांना दिले.यावेळी अशोक नगर कारखान्याचे संचालक अमर आप्पा ढोकचौळे प्रदीप गायकवाड विशाल सुरडकर संदीप बागुल डॉ. सुधीर ब्राह्मणे राजू खाजेकर आनंद चावरे प्रदीप कदम शरद भनगे रमेश ढोकचौळे इज्जॉस शेख जाना भाऊ खाजेकर राजू त्रिभुवन रावसाहेब ढोकचौळे त्याचप्रमाणे परिसरातील संपूर्ण महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय बोरगे यांनी केले.