अप्पर पोलीस अधिक्षक वाघचौरे यांच्यामुळे वाहतुकीला लागली शिस्त;श्रीरामपूर शहरातील वाहतूक कोंडी सुटण्याची आशा

श्रीरामपूर-
न्यायालयाच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिक ठिकाणचे अनेक अतिक्रमण काढण्यात आले. त्यामध्ये श्रीरामपूर शहरातील देखील अतिक्रमण मोठया प्रमाणात काढण्यात आले. मात्र तरीही श्रीरामपूर शहराच्या प्रमुख रस्त्यावर दुतर्फा दुकानच्या समोर अनेक वाहन चालक आपली दुचाकी/चारचाकी अस्तव्यस्त लावत असल्यामुळे अनेकदा वाहुतुकीची कोंडी होऊन अडचण येत होती. मात्र अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी नुकतेच सुत्र हाती घेताच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत संबंधित दुकानदार व व्यावसायिकला देखील सुचना दिल्या.त्यामुळे वाहतुक कोंडी सुटण्याची वाट मोकळी झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अशीच कारवाई कायम करण्याची मागणी केली जात आहे.मागील सप्ताहातच अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून सोमनाथ वाघचौरे पदभार स्वीकारत अप्पर कार्यालयाबाहेर अवैध वाहतुक करतांना प्रशासनाने पकडलेले डंपर, ट्रक, टेम्पो आदी वाहने तालुका पोलिस ठाण्याबाहेर अस्ताव्यस्त पद्धतीने लावण्यात आले होते. प्रथमच ती वाहने व्यवस्थित रित्या बाजुला लावण्यात आल्याने कार्यालयात ये – जा करतांना अडथळा दूर करण्यात आला. यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बँका, चहाची दुकाने व इतर व्यावसायिक यांच्या समोर पालिकेच्या पट्टया बाहेर लावली जाणारी वाहनावर कायदेशीर कारवाई करत दंड लावल्याने वाहन चालक देखील आपली वाहने पांढऱ्या रेषेच्या आत पार्क करायला लागली शिवाय व्यावसायिक देखील वाहन चालकांना दंड होईल व्यवस्थित वाहने लावण्याचा सल्ला देत आहे.

दुकानदाराच्या बाहेर रस्त्यावर दुचाकी चालक कुठेही गाडी लावत असल्याने चार चाकी वाहन चालकासमोर वाहन पार्क साठी पर्याय नसतो. त्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. तसेच महाविदयालयाकडे येणाऱ्या – जाणाऱ्या, बिगर नंबर, मोठया आवाजाच्या व सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यावर देखील अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अशीच कारवाई कायमस्वरूपी सुरू ठेवुन कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News