सप्ताह सनातन हिंदू धर्म परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण-जलसंपदा मंत्री विखे पाटील; १७८ व्या हरीनाम सप्ताहाचे शनिदेवगाव येथे ध्वजारोहण

१७८ व्या हरीनाम सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

श्रीरामपूर-
सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण आहे.या अध्यात्माच्या अधिष्ठानामागे समाजाने उभ्या केलेल्या शक्तीमध्येच सप्ताहाचे यश असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.गुरूवर्य गंगागिरीजी महाराजांच्या १७८ व्या हरीनाम सप्ताहाचे आयोजन श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील शनिदेवगाव येथे करण्यात आले आहे.सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी खा.संदिपान भुमरे,आ.रमेश बोरनारे, सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष महंत हरीशरण गिरीजी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर,मा आ. भानूदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रभाकर शिंदे,मा. सभापती दिपक पटारे,अविनाश गलांडे,पंकज ठोंबरे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,प्रभाकर शिंदे,जितेंद्र छाजेड,गिरीधर आसने,ऍड अजित काळे,कडूभाऊ काळे
यांच्यासह वारकरी सांप्रदायातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री विखे पाटील म्हणाले की,या सप्ताहाच्या परंपरेची वाटचाल द्विशताब्दीकडे सुरू आहे.जगाच्या पाठीवर अध्यात्मिक क्षेत्रातील या सोहळ्याने अनेक विक्रम केले.

गुरूवर्य गंगागिरीजी महाराजांच्या १७८ व्या हरीनाम सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करताना ना. राधाकृष्ण विखे पाटील

केवळ ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत भक्ती रसामध्ये एकरुप होणारी समाजशक्ती हेच या सप्ताहाचे यश आहे.महंत रामगिरीजी महाराज हिंदू धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी  ठाम भूमिका घेवून जेव्हा बोलतात तेव्हा समाजाने सुध्दा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली पाहीजे.यंदाचा सप्ताह ऐतिहासिक होण्याकरीता प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे.परमार्थाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी प्रत्येकाने एक पाउल पुढे टाकण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील यांनी शनिदेवगाव गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचै काम सप्ताह सुरू होण्यापुर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण दिले आहे. शनिदेवगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामास आपण मंजूरी दिली आहे.यासाठी लागाणारा 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला जाताना मंत्री विखे पाटील यांनी कमलपूर येथील दुरुस्ती करण्यात आलेल्या पुलाच्या कामाची पाहाणी करून कठड्याचे काम त्वरित पूर्ण आदेश दिले आहेत.
याप्रसंगी आ.रमेश बोरनारे यांनी तीन जिल्ह्यांच्या सीमेवर होणारा सप्ताह वैजापूर तालुक्यात घेण्याचे भाग्य मिळाले असून मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने या भागातील व पुलावरील रस्ता आणि संरक्षण कठड्याचे काम मार्गी लागले असल्याचे सांगितले.या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महंत रामगिरीजी महाराज यांनी नारायणगिरीजी महाराजांनी शनिदेवगाव येथे सप्ताह घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यावर्षी पूर्ण होत असल्याचे सांगून सप्ताहाला सहकार्य करणार्या देणगीदारांची नाव जाहीर केली.आभार महंत हरीशरण गिरीजी महाराज यांनी मानले.

बंधाऱ्याच्या 250 कोटींच्या कामास मंजुरी
शनिदेवगाव गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे सप्ताह सुरू होण्यापुर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण दिले आहेत. तसेच शनिदेवगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामास आपण मंजूरी दिली आहे.यासाठी लागाणारा 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News