श्रीरामपूर-
दत्तनगर गावामध्ये बस थांबा द्या या मागणीचे निवेदन श्रीरामपूर येथील बस आगर प्रमुख साळुंखे यांना भिम शक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले.
यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर परिसर हा खूप मोठा असून या दत्तनगर परिसरामध्ये अनेक गाव असून तेथील मुला मुलींना लोणी येथील आय टी आय कॉलेज मेडिकल कॉलेज ला रोज शिक्षणासाठी जावे लागते तसेच कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात येथून लोणी असेल संगमनेर असेल शिर्डी असेल कोपरगाव असेल राहाता असेल या परिसरामध्ये कामाला जावं लागतं बस न थांबल्यामुळे त्यांना तिथून श्रीरामपूरला यावं लागतं त्यामुळे त्यांना कामावर म्हणा मुला मुलींना कॉलेजला जाण्यासाठी खूप उशीर होतो आणि त्यांचा त्या – जाण्याने मध्ये वेळ जातो अक्षरशः लोकांचे मुला-मुलींचे खूप हाल होत आहे त्यामुळे या परिसर खूप मोठा असल्यामुळे लोकांना एसटी बस थांबण्याची गरज आहे कारण सरकारने आत्ताच लोकांसाठी हात दाखवा बस थांबवा असे ब्रीद वाक्य तयार केले आहे परंतु लोकांना त्याचा लाभ मिळत नाही महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली असून सुद्धा तेथून महिलांना बस मिळत नाही त्यामुळे आपण या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून बस थांबण्याची व्यवस्था करावी व तेथे बस थांबा असा फलक देण्यात यावा अन्यथा आम्ही आठ दिवसांमध्ये बस रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हाला निवेदनाला द्वारे कळवतो यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे सुरेश शिवलकर विशाल पठारे विश्वास भोसले सचिन राठोड सनी बारसे अनिल त्रिभुवन तुषार वाहूळ दर्शन बारसे हर्षल मखरे आधी उपस्थित होते
