श्रीरामपूर-
शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांनाभाविकांना होणार आहे, तसाच तो व्यापारी आणि कृषी क्षेत्रालाही होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती देताना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती.

ना.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
ना. विखे पाटील पुढे म्हणाले की,शिर्डी विमानतळावर अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर काही कामे प्रस्तावित आहेत. या सर्व बाबींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित विभागांना व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश देण्यात आले.शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून शिर्डीची हवाई कनेक्टिविटी आणखी मजबूत होणार आहे. याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या भाविकांना होणार आहे, तसाच तो व्यापारी आणि कृषी क्षेत्रालाही होणार आहे. म्हणूनच आपण विमानतळाच्या विस्तारासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत, असेही ना. विखे पाटील यांनी सांगितले.