श्रीरामपूर-
हिंदुत्ववादी नेते भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा हा बनावट व राजकीय हेतूने प्रेरित असून या गुन्ह्यातून त्यांचे नाव तात्काळ वगळण्यात यावे अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 678/2025 अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकाश चित्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय वास असून, हे संपूर्ण प्रकरण एका नियोजित राजकीय षड्यंत्राचा भाग आहे.संबंधित महिलेसोबत प्रकाश चित्ते यांची कोणतीही ओळख नाही. त्या महिलेबाबत कोणताही पूर्वसंपर्क नसताना त्यांच्याविरोधात एक काल्पनिक आणि खोडसाळ प्रकारची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. “ही एक प्रकारची बदनामी मोहीम असून, त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न आहे,” असेही नमूद करण्यात आले आहे.

प्रकाश चित्ते यांनी यापूर्वी मुल्ला कटर टोळी विरोधात सातत्याने आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने करत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण संघर्ष संपूर्ण शहरास माहित आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर दाखल झालेला हा गुन्हा विरोधकांनी रचलेल्या कटाचा भाग असून, त्यांचे सामाजिक आणि राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षड्यंत्र रचले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मंडईत न बसवता शिवाजी चौकातच बसवावा या मागणीसाठी प्रकाश चित्ते यांनी उघड भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनावर भाजप नेते सुनील मुथा, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सिद्धार्थ मुरकुटे, आर पी आय चे सुरेंद्र थोरात, शिवसेना शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे, भाजप नेते बबन मुठे आम आदमीचे प्रवक्ते तिलक डुंगरवाल, मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, मनसे तालुकाध्यक्ष अमोल साबने मनसे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, राजेंद्र सोनवणे, संजय पांडे, किरण लुनिया, मा. नगरसेवक संतोष कांबळे, राजेंद्र कांबळे, राजेंद्र चव्हाण, शिवसेना नेते संजय छल्लारे, संजय राऊत, सुरेश सोनवणे सर, गौतम उपाध्ये, शत्रुघ्न गव्हाणे, गणेश भिसे, संजय यादव आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.