भूमिपूजन एकिकडे,स्मारक दुसरिकडेच असे का?; आ.ओगले यांचा विधिमंडळामध्ये चर्चेदरम्यान सरकारला सवाल

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले मात्र प्रत्यक्षात सदर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नेहरू भाजी मंडई येथे स्थापित का करण्यात आला असा सवाल आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळामध्ये चर्चेदरम्यान उपस्थित केला.
यावेळी आमदार ओगले म्हणाले की, सबंध श्रीरामपूरवासियांची गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बसवावा. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक मान्यवरांच्या हस्ते सदर ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आले. परंतु अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची जागा बदलून नेहरु भाजी मंडई मध्ये महाराजांचा पुतळा घाईघाईत बसविण्यात आला या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन देखील केलेत तसेच महाराजांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच व्हावा याकरिता मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये जवळपास 55 हजार नागरिकांनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बसवावा यासाठी सह्या केल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळातच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा तयार झाले होते. जर नेहरू भाजी मंडई समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवायचा असता तर गेल्या दहा वर्षांपूर्वीच सदर स्मारक त्या ठिकाणी तयार झाले असते परंतु समस्त श्रीरामपूरवास यांची इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच स्थापित व्हावा.महापुरुषांचे पुतळे, स्मारके यामध्ये कोणतेही राजकारण न करता नागरिकांची अस्मिता लक्षात घेऊन पहिल्या दिवसापासून आपण या विषयात आवाज उठवत आहोत असे देखील आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले आहे.

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा देखील तयार असून फक्त वनविभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी सदरचा प्रश्न प्रलंबित आहे तरी आपल्या स्तरावरून याबाबत संबंधितांना आदेश देऊन वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना द्याव्यात अशी देखील मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.

विधिमंडळात चर्चेदरम्यान बोलताना आ. हेमंत ओगले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News