श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण कारवाईमुळे विस्थापित झालेल्या व्यावसायिक व व्यापाऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचे पुनर्वसन करून विस्थापितांना पाच फुटाची जागा देण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश केले आहेत,असे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विस्थापितांना आश्वस्त केले असल्यामुळे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने त्यांच्या अभिनंदनचा ठराव टाळ्याच्या गजरात एकमताने आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता
शासकीय विश्रामगृह या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन अध्यक्ष अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.रविवार दिनांक 13 जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषद यशवंतराव सभागृह या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी गेली सहा महिन्यापासून नगरपरिषदेने दुकानदारांचे अतिक्रमण काढून त्यांना विस्थापित केले आहे. त्या विस्थापित दुकानदारांना नेवासाच्या धरतीवर पाच फुटाची जागा देऊन पुनर्वसन करावे अशी विनंती केली होती.त्यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी पुनर्वसन करून विस्थापितांना पाच फुटाची जागा देण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश केले.प्रांताधिकारी किरण सावंत तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना विस्थापित व्यापाऱ्यांना पाच फुटाची जागा व्यापार करण्यासाठी देण्यासंदर्भात दोघांनी बसून त्वरित निर्णय घ्यावा असे आदेश त्यांनी केल्यामुळे विस्थापित व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.
बैठकीच्यावेळी किशोर ओझा शरीफ शेख कैलास बाविस्कर विजय छाजेड सलगर पिंजारी शाहरुख मन्सुरी रईस शेख श्रीराम निकुंभ असलम अत्तार असिफ मणियार राजेश श्रीवास्तव सुदर्शन देवकाते प्रदीप निकम रिंकू लुल्ला राकेश थोरात वणेश तुवर आशिर सय्यद दिलीप फरगडे मुनीर शेख विशाल सावद्रा शाहरुख बागवान सद्दाम बागवान वसीम बागवान शाहिद बागवान किरण कतारे बाबूलाल मांडल प्रेम शिंदे किशोर परगडे प्रशांत सूर्यवंशी गौतम गादिया भारत जगताप सलमान शहा मनोज गायकवाड गोविंद ढाकणे ताया शिंदे हरीश आछडा सोमनाथ सोनवणे किशोर नागरे गोविंद ढाकणे लखन वदवाणी बाबासाहेब मोरगे संजय शेलार भागवत संत सुमनबाई बनकर संदीप ठाकरे नितीन लांबोळे उत्तम चित्ते पराग कुलकर्णी पोपट वाघचौरे हरी शिरसागर रज्जाक शेख अक्षय गवळी विठ्ठल जावळे दादाभाऊ कोपरे अवंतिका देवकाते श्रीराम लावर संजय महांकाळे, मलंग शेख सत्तार पिंजारी जया तरटे बापू सोनवणे विजय चोरमल गुलाब गायकवाड मस्जिद मेमन आधी उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल शहाणे यांनी केले. आभार किशोर ओझा यांनी मानले.
