श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील हिंद सेवा मंडळाच्या क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालच्या भौतिक,शैक्षणिक व सुशोभीकरणासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन पाटबंधारे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.क.जे.सौमेय्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने चेअरमन रणजित श्रीगोड,शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे यांनी नामदार विखे यांना निवेदन दिले. याप्रसंगी उत्तर अहिल्यानगर चे भाजपा अध्यक्ष नितिन दिनकर,शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र छाजेड माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, अभिषेक पाटील खंडागळे, के. के आव्हाड यांचे सह आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी ना. विखे पाटील म्हणाले, हिंद सेवा मंडळाचे शैक्षणिक विकासासाठी जिल्ह्यात नावलौकीक आहे. या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी तसेच विविध पदावर कार्यरत आहे.क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक, भौतिक विकास तसेच विद्यालयाच्या स्वच्छता गृह, महाविद्यालयासाठी परिसर सुशोभिकरण करण्यासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन दिले.
