श्रीरामपूर-
भारतीय दूरसंचार निगमच्या कारभाराबद्दल दूरध्वनीधारकांच्या असलेल्या तक्रारी व गैरसमज दूर करून उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून ती पहिल्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे प्रतिपादन टेलिफोन निगमचे नूतन संचालक ऍड. रवींद्र बोरावके यांनी केले. श्रीरामपूर येथे माळी बोर्डींग, समता प्रतिष्ठान व अखिल भारतीय महात्मा फुले, समता परिषद आदींच्या संयुक्तीक विद्यमाने भारत संचार निगमच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल ऍड. रवींद्र बोरावके व आरोग्य मित्र, नागेबाबा परिवाराचे सदस्य सुभाषराव गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. बोरावके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे होते.
याप्रसंगी आ. हेमंत ओगले, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, श्री इम्पेक्सचे संचालक विजय कुदळे, कोपरगाव माळी बोर्डींगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, श्रीरामपूर माळी बोर्डींग अध्यक्ष दीपक गिरमे, विश्वस्त सुरेंद्रनाना गिरमे व पदाधिकारी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कुर्हे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे, विवेक गिरमे, प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, शंकर गागरे, शिवाजीराव बारगळ, शशांक रासकर, जालिंदर कुर्हे, सुनील सोनवणे, बाळासाहेब हरदास, राजेंद्र सातभाई, दादासाहेब मेहेत्रे, सुभाष वाघुंडे, सचिन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. हेमंत ओगले, करण ससाणे व सचिन गुजर आदींनी मनोगतातून ऍड. बोरावके यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक चंद्रकांत झुरंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले. तसेच विलास घोगरे, एकनाथ दुधाळ, जेष्ठ नागरीकचे लक्ष्मण निकम, एस. के. कुर्हे, विलास कुदळे, राऊत, सर होले, अशोक ससाणे, लक्ष्मण आगरकर, अशोक सोनवणे, किशोर ससाणे, प्रभाकर भोंगळे, ज्ञानेश्वर पवार, डॉ. लोंढे आदींसह श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
