“विठुरायाच पावला”;आषाढ सरींमुळे खरीप पिकांना जीवदान;श्रीरामपूर तालुक्यात सोयाबीन,कपाशी,मका तरारली

श्रीरामपूर-नितीन शेळके
मे महिन्यात अवकाळी पाऊस मनसोक्त बरसून गेल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांसाठी ज्या मान्सूनच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस अगदी वेळेच्या अगोदर दाखल झालाही होता.जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात जुनच्या पहिल्या आठवड्यातच सुमारे 65 टक्के पेरण्या उरकल्या.त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली.सुमारे 20 ते 25 दिवस पावसाचा मोठा खंड तालुक्यात पडला.पेरणी झालेले सोयाबीन, मका आणि कपाशी माना टाकू लागली.भंडारदरा, निळवंडे व नाशिक च्या धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस सुरू होता.त्यामुळे प्रवरा व गोदावरी नद्या वेळेच्या आतच वाहत्या झाल्या.तरीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती दमदार पावसाची.अखेर आषाढी एकादशी पासून आषाढ सरी बरसणे सुरू झाले.त्यात म्हणावा असा जोर जरी नसला तरी शेतशिवारातली खरीपाची पेरण्या झालेली पिके तरारून उठली.पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजाही ‘विठुरायाच पावला’ असे म्हणत काहीसा चिंतामुक्त झाला.रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.कारण अद्यापही बहुतांशी विहिरी व बोअरवेल कोरडेठाक आहेत.तालुक्यातील बेलापूर, मातापूर, अशोकनगर, खंडाळा, निपाणी वडगाव, खोकर, भोकर,कमलपूर, भामठाण, माळवडगाव,खानापूर,टाकळीभान सह सर्वच गावांमध्ये रिमझिम स्वरूपात पाऊस गेली दोन दिवस सुरूच आहे. सध्या भंडारदरा-निळवंडे धरणातून आवर्तन सुरू करण्यात आलेले असल्याने त्याचाही फायदा तालुक्यातील पाटाखालील सिंचन क्षेत्राला होणार आहे. याव्यतिरिक्त गोदावरी आणि प्रवरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीत पाणी असल्याने त्यांचीही चिंता काही प्रमाणात मिटली आहे.जायकवाडी धरण सुमारे 55 टक्क्यांपर्यंत भरले आहे. तसेच पावसाळ्याचे अजून दोन अडीच महिने शिल्लक असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जायकवाडीला पाणी सोडावे लागण्याची चिंता असणार नाही,असे सध्यचे चित्र आहे.खरीप हंगामातील पिके सध्या जगली असली तरी खतांचे व कीटकनाशकांचे वाढलेले दर युरियाची अनुपलब्धता,लिंकिंग करून खते घेण्याची सक्ती अशा इतर प्रश्नांना शेतकऱ्यांना सध्याच्या घडीला तोंड द्यावे लागत आहे.जिल्ह्यात सर्वत्रच युरियाचा तुटवडा असल्याने शेतकरी बेजार झाला आहे.तसेच या वर्षी पासून सरकारने 1 रुपयात सुरू असलेली पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.नव्याने सुरू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचे चित्र आहे.31 जुलै ही या योजनेत सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत आहे.त्यामुळे अनेक सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी कमी दिसून येत आहे.

चौकट-
१) ‘ओस पडलेली कृषी केंद्र गजबजली…’
पाऊसच गायब झाल्याने तालुक्यातील कृषी केंद्र अगदी ओस पडली होती. खतांची खरेदी नाही की कीटकनाशकांना मागणी नाही,अशीच काहीशी अवस्था गेले काही दिवस दिसून येत होती.शेतकऱ्यांचा पीक व्यवस्थापनातला उत्साह हरपला होता.परंतु आता पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने आपसूकच शेतकरी पुन्हा कृषी केंद्रावर दिसू लागले आहेत.

२) ‘हवामानतज्ञांच्या नावानेही सुरू होता शिमगा’
20-25 दिवस मान्सूनच्या पावसात खंड पडला.त्यामुळे नेहमी नित्यनेमाने हवामानाचे अंदाज व्यक्त करणारेही अचानकपणे ‘गायब’ झाले. जून महिन्यात सर्वत्र धो-धो पाऊस पडणार म्हणणानाऱ्या अनेक हवामान तज्ञांच्या नावाने या काळात बोटे मोडली गेली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News