दत्तनगरच्या समस्यांचे तात्काळ निवारण करा;अन्यथा उग्र आंदोलन करू;भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मगर यांचा इशारा

श्रीरामपूर–दत्तनगर भागातील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करा अन्यथा आठ दिवसांमध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू या मागणीचे निवेदन ग्रामसेवक...

श्रीरामपूर
दत्तनगर भागातील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करा अन्यथा आठ दिवसांमध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू या मागणीचे निवेदन ग्रामसेवक रुबाब पटेल यांना भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिले आहे.
यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर गावातील प्रत्येक भागात रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये पडल्याने लोकांना खड्डे दिसत नाही आणि खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहे. तसेच खड्ड्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यास सुद्धा खूप त्रास होत आहे. अनेक वेळा खड्डे बुजवण्याची मागणी केली असता ती मागणीकडे दुर्लक्ष केले आहे लाईटची खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक भागात लाईट बंद आहे लोकांना अंधारातून जावा लागत आहे सगळीकडे कचरा साचल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे साफसफाई सुद्धा होत नाही अनेक भागात गटारी तुंबल्याने डास खूप वाढलेले आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. स्मशानभूमीत शवदायिनी मागणी अनेक दिवसापासून केली असता ति पूर्ण न झाल्यामुळे  तिथे अक्षरशा अंत्यविधी खाली करावा लागत आहे. तसेच सध्या घरकुलाची यादी चालू आहे परंतु काही लाभार्थीकडे अपुरे कागदपत्र असल्यामुळे त्यांची आपण नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आपण सर्वांना लाभ कसा देता येईल यासाठी आपण पुन्हा लाभार्थ्याची नोंदणी करावी असे अनेक प्रकारच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. जर येत्या आठ दिवसांमध्ये लोकांच्या मागणीचा विचार न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागण्या पूर्ण करण्यासाठी तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू असा इशारा शेवटी देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, सुरेश शिवलकर, विश्वास भोसले, संतोष केदारे, अश्रू बादमे,अनिल माघाडे ,तन्वीर शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दत्तनगरच्या विविध समस्यांबाबत ग्रामसेवक यांना भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!