खाजगी क्लासेसकडून विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट;कारवाईची रिपाईची मागणी

श्रीरामपूर:
श्रीरामपूर शहरात ९ ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लासचालक शिक्षकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा रिपाई च्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांना रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड महिला आघाडीच्या रमादेवी धीवर शहराध्यक्ष विजय पवार राष्ट्रीय जनसेना पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांच्या हस्ते इतर देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच श्रीरामपूर शहरात गेली अनेक वर्षापासून ९ ते १२ वी  पर्यंत विविध विषय तसेच सी ई टी, जी ई ई शिकवण्याचे खाजगी क्लास धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करून त्या नोंदणीच्या अधारे बऱ्याच शिक्षकांनी आपले क्लास श्रीरामपूर तालुका व शहरामध्ये थाटले आहेत. त्या आधारे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालू आहे. ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषय इंग्लिश, मॅथ व सायन्स या विषयाचे 16 हजार रुपये घेतले जातात. तसेच दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीन विषयाचे ३० हजार रुपये घेतले जातात. अकरावी बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एका विषयाचे २० हजार रुपये तर  चार विषय शिकवले जातात.बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री सायन्स या चार विषयाचे ८० हजार रुपये घेतले जातात. एका तासाला २०० ते २५० विद्यार्थी एका क्लास मध्ये क्लासला येतात ६ ते ११ वाजेपर्यंत चार बॅच होतात. म्हणजे आठशे ते नऊशे विद्यार्थी क्लासमध्ये रोज शिकतात तसेच सी जी ई इ ची फी अडीच लाख रुपये आहे.श्रीरामपूर शहरांमध्ये क्लास ची संख्या जवळजवळ 25 ते 30  संख्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेणाऱ्या पैशाची उलाढाल ही करोडो रुपयांच्या घरात जाते. म्हणून अशा मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयेची आर्थिक लूट केली जाते. तसेच एवढी मोठी आर्थिक उलाढाल असताना सरकारला हे क्लासेसवाले जीएसटी भरतात का? याचा देखील सखोल तपास केला पाहिजे. तसे पाहायला गेले तर खाजगी क्लास चालवायला सरकारी मान्यता नसताना तरी देखील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करून देखील शासन तसेच लोकप्रतिनिधी या खाजगी क्लास चालकांना चकार शब्द सुद्धा जाब विचारात नाही. म्हणून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लास चालकांचे दप्तर तपासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन विद्यार्थ्यांना परवडेल अशी वाजवी फी घेऊन त्याचा फलक क्लास बाहेर मोठ्या अक्षरात लावण्यात यावे. तसेच मुलांना शिकवणारे शिक्षक प्रशिक्षित आहेत का त्याची देखील चौकशी झाली पाहिजे.अन्यथा रिपाई च्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे.त्यावेळी मनोज काळे, कारभारी त्रिभुवन, संजय बोरगे, उज्वला येवलेकर, बाबासाहेब पवार, विलास जाधव, संघराज त्रिभुवन आदी उपस्थित होते.

क्लासचालक शिक्षकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News