श्रीरामपूरमध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्सची चौकशी करा-आ.ओगले;अधिवेशनात पिकविमा,कर्जमाफी, बोगस बियाणे प्रश्नांवर आ.ओगलेंनी सरकारला घेरले

श्रीरामपूर:
श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्स बाबत सखोल चौकशी करा अशी आग्रही मागणी राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीवर बोलताना श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी केली.आ ओगले यांनी अधिवेशनात अत्यंत आक्रमक भूमिका घेत मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांना वाचा फोडली. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्स बाबत सखोल चौकशीची मागणी त्यानी लावून धरत श्रीरामपूर सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स बरोबर नशेचे इंजेक्शन वाईटनर यांसारख्या अमली पदार्थांची सर्रास विक्री चालू असून मोठ्या प्रमाणावर गांजा देखील तस्करी होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आ. ओगले यावेळी म्हणाले की, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मतदारसंघात पोलीस स्टेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे.देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनसाठी मी पहिल्या दिवसापासून मागणी केलेली आहे त्याबाबत देखील सकारात्मक भूमिका घ्यावी. संपूर्ण मतदारसंघात महावितरणच्या सेवेचे तीन तेरा वाजले असून श्रीरामपूर येथील २०० के. व्हीं चे मंजूर असलेल्या सबस्टेशनचे काम तातडीने चालू करावे.त्यामुळे मतदारसंघातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अनेक शेतकरी बांधवांनी सोलर कृषी पंपांची मागणी करून देखील शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप मिळत नाहीत.बोगस बियाणांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून यामुळे बळीराजा अडचणीत येताना दिसत आहे याबाबत सरकार कठोर पावले उचलणार आहे का ? शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केवळ घोषणाच ठरली असून कृषी विभागाने पीक विम्याचा करोडो रुपयांचा हप्ता देखील आजतागायत भरला नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे सरकारने तातडीने पिकविमाचा हप्ता भरावा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीवर बोलताना श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले.

*चौकट:पिकविम्याची थकीत रक्कम वर्ग करण्याचा निर्णय
पिकविम्याची थकीत रक्कम त्वरित भरण्याबाबत आ. हेमंत ओगले यांनी सभागृहात आवाज उठवताच राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध करत सुमारे ३७५ कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News