श्रीरामपूर-
तालुक्यातील कमलपुर या छोट्याशा गावात शून्यातून विश्व निर्माण करणारे अध्यात्मिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारे भाऊसाहेब कणसे यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाऊसाहेब कणसे यांनी श्रीरामपूर तालुक्यात विश्व हिंदू परिषदचे तालुका कार्यवाह म्हणून देखील काम केलेले आहे
श्रीरामपूर तसेच वैजापूर तालुक्यातुन देखील त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे. देवगाव शनी,ता.वैजापूर येथे होणारा 178 व्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह यात देखील भाऊसाहेब कणसे यांचे मोलाचे योगदान आहे भाऊसाहेब कणसे यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे मित्र आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये उत्साहाचे व आनंदी वातावरण आहे.नुकताच कणसे यांचा सप्तक्रोषीच्या वतीने शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
