श्रीरामपूर-
राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करीता आपण गुडघे टेकायलाच लावू.निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार सत्तेत आल्यानंतर करत असले तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील कारवाडी मध्ये शेतकरी संघटनेच्या शाखेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे हेही उपस्थित होते.
कारवाडी येथील शेतकरी संघटनेचे शाखा अध्यक्षपदी दिलीप दहे तर उपाध्यक्षपदी परवेज शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ऍड. अजित काळे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून आपण लढत राहणार आहे. सत्तेमधील मंत्री अथवा आमदार करीत
असलेल्या बेताल वक्तव्यांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की यापुढे शेतकऱ्यांना बद्दल कोणतेही बेताल वक्तव्य कदापी खपवून घेतले जाणार नाही.
जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी शेतकऱ्यांना वीजेच्या, कर्जाच्या, महसुली अथवा इतर कोणत्याही समस्यांवर खंबीरपणे शेतकरी संघटना उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले. साखर कारखाने संघटीतपणे लुट करत असल्याच्या विरोधातही येणाऱ्या काळात आपण आवाज उठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. रोहीत कुलकर्णी यांनी तालुक्यात जास्तीत जास्त शाखा उघडण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरी अप्पा तुवर ,तालुकाध्यक्ष अशोक काळे ,उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे , युवा अध्यक्ष डॉ रोहित कुलकर्णी , जिल्हा संघटक भास्कर तुवर , कायदेशीर सल्लागार एडवोकेट बाळासाहेब कावळे , श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, साहेबराव चोरमल ,एडवोकेट सर्जेराव घोडे,सागर गिरे, प्रकाश जाधव ,शांताराम तुवर , दिलीप पवार , साहेबराव पवार , राजेंद्र कोकणे , बंडू चौगुले ,अजित तुवर , सुनिल शिंगोटे ,गंगारामजी तुवर , कैलास पवार , सुधाभाऊ तुवर , हरिभाऊ जगताप ,बादशाह बेग , समीर शेख , सलीम शेख , मुजफ्फर बेग , आयुबभाई बेग , अतुल शिंगोटे , नचिकेत कुलकर्णी , चंद्रकांत हिरवे , गणेश घोगरे , संतोष बोरुडे , गणेश शिंदे , निसार शेख , हनुमंतराव वाकचौरे , बाळासाहेब शिंगोटे , विशाल पंडीत , गोरख पंडीत , जगन्नाथ तुवर , सुनिल तांबे , योगेश थिटे , दत्तु सावंत , हरिश्चंद्र तांबे , चिलीया तुवर , राधाकृष्ण सुरोसे ,
दगडू शिंगोटे , सइद शेख , योगेश घोगरे , किरण लंघे , सोमनाथ औटी आदी मान्यवरांसह मोठा शेतकरी समुदाय उपस्थित होता .
