गुन्हेगारांना कायद्याचा धाक असायलाच पाहिजे;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ठणकावले

श्रीरामपूर-समाजकंटक आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक असलाच पाहिजे.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांकडे येताना सुरक्षित वाटले पाहिजे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक असायलाच हवा...

श्रीरामपूर-
समाजकंटक आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक असलाच पाहिजे.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांकडे येताना सुरक्षित वाटले पाहिजे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक असायलाच हवा असे प्रतिपादन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरात असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे श्रीरामपूर येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले गुन्हेगारीमुक्त शहर आणि शांतताप्रिय समाजासाठी पोलीस व जनता यांच्यातील ‘संवाद’ हाच सर्वात मोठा दुवा आहे.त्यामुळे हा संवाद कायम राखला जावा.यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप उपस्थित होते.दरम्यान शहरातील उपस्थित विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक यांनी शहराच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आपले विचार मांडले.अनेकांनी शहराची विस्कटत चाललेल्या घडीवर बोट ठेवत पोलीस प्रशासनाने कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी विनंती केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

श्रीरामपूर पोलीसांकडून 27 मोबाईल मूळ मालकांना परत

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल शहर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या मूळ मालकांना डीवायएसपी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते

Latest News

Trending News

error: Content is protected !!